कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याला पावसाचा इशारा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कुलाबा वेध शाळेने पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह वीजा चमकून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर परिणाम झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण झाले आहे. मंगळवारी (दि.३) पहाटे पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्याचा फटका गुऱ्हाळघरे, साखर कारखाने आणि ऊस तोडणीवर होणार आहे.

बुधवारी (दि.४) कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तर, गुरूवारी (दि.५) वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि सांगली, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (दि.६) कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.७) रोजी मात्र पाऊस नसणार आहे. असा अंदाज वेध शाळेने व्यक्त केला जात आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी