पाटणा : बिहारमधील निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील सुधारणांच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गाधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सीपीआयचे डी.राजा, सीपीएमचे दीपांकर भट्टाचार्य, यांच्यासह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पाटणा येथील गोलंबर येथून निषेध मोर्चास सुरूवात झाली. (Rahul Tejashwi lead protest)
यावेळी झालेल्या सभेत बोलताना तेजस्वी यादव यांनी भाजप आणि नितिश कुमार यांच्या ‘गोदी आयोगा’ विरोधात क्रांती करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाची दादागिरी सहन करणार नाही. बिहार ही लोकशाहीची जननी आहे. येथील लोकशाही संपवली जात आहे. बिहारचे लोक हे होऊ देणार नाहीत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीवर टीका केली आहे. राहूल गांधी म्हणाले, काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणूका झाल्या. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. पण विधानसभा निवडणूकीत घोटाळा झाल्याचे दिसून आले. आम्ही मतदारांचा डेटा पाहण्यास सुरुवात केला असता लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीत एक कोटी नवीन मतदार निर्माण झाले. एकाच बिल्डिंगमध्ये चार ते पाच हजार मतदार नोंदवले गेले आणि गरीब मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. जिथे मतदार वाढले तिथे भाजप विजयी झाला, असेही राहुल गांधी म्हणाले. (Rahul Tejashwi lead protest)
महाराष्ट निवडणूक आयोगाकडे आम्ही मतदारांची यादी मागितली. व्हिडिओ शूटिंग मागितले पण सरकारने कायदाच बदलला असे सांगून राहूल गांधी यांनी महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये निवडणूक घोटाळा होण्याची भिती व्यकत केली. महाराष्ट्र निवडणूक घोटाळ्याचे मॉडेल बिहारमध्ये आणणार आहेत. हे मॉडेल गरीबांची मतांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न आहे. पण बिहारची जनता असे होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग भाजप आरएसएस प्रमाणे बोलत आहे. निवडणूक आयोग हे विसरला आहे की तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो तर तो भारत देशाचा निवडणूक आयोग आहे. संविधानाचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे असेही राहूल गांधी म्हणाले. पूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि भारताचे सरन्यायाधीश करत असत. आता मोदींनी सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त नियुक्ती समितीतून हटवले आहे. बिहारमधील मतांची चोरी नसून त्यांच्या भविष्य आणि हक्काची चोरी होणार आहे. संपूर्ण बिहार निवडणूकीत घोटाळा होऊ नये यासाठी दक्ष आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. (Rahul Tejashwi lead protest)