राहुल गांधींना गाझीपुरात रोखले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा गाझीपूर सीमेवरच रोखला. पोलिसांनी या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. (Rahul Gandhi)

दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागातील पीडितांना भेटण्याचा मला घटनात्मक अधिकार आहे. मात्र तो नाकारला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, सुरक्षेचा ताफा सोडून माझी एकट्याने संभलला जाण्याची तयारी आहे. याआधी मी संभलला जाणार होतो. मात्र त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीचे कारण देत काही दिवसांनी येण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही आज निघालो होतो. मात्र आता पुन्हा आम्हाला रोखण्यात आले आहे. पीडितांना भेटून त्यांची विचारपूस करणे ही माझी जबाबदारी आहे. माझा तो संवैधानिक अधिकार आहे. मात्र तो नाकारला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. (Rahul Gandhi)

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वद्रा यांनी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना हिंसाचार पीडितांना भेटण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘संभलमध्ये जे काही घडले ते चुकीचे आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. त्यांना तिकडे जाण्यापासून अशा प्रकारे रोखता येणार नाही. संभलमधील पीडितांना भेटण्याची परवानगी मिळण्याचा घटनात्मक त्यांना अधिकार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची त्यांची तयारी आहे. पण उत्तर प्रदेशची परिस्थिती त्यांना हाताळता येत नाही. त्यामुळे कदाचित त्यांना तिथे जाऊ देण्यात येत नाही.’

काँग्रेसकडून हिंसाचाराचे राजकारण : उपमुख्यमंत्री पाठक (Rahul Gandhi)

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी, काँग्रेस नेते संभल हिंसाचाराचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकारण्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, संभल प्रकरणाचे राजकारण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कृपया कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नका. तुमच्या भेटीमुळे तिथले वातावरण बिघडत आहे. घटनास्थळावरून पाकिस्तानातून आलेले काडतूस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात कुणीही सहभागी असो त्यांची गय केली जाणार नाही. संभलमधील परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.’

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले