नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेम्स व्हॅन्स भारत दौऱ्यावर आले असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे असे गांधी म्हणाले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत घोटाळा झाल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने राहूल गांधींच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांना देशद्रोही संबोधले आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. (Rahul Gandhi statement)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना त्यांनी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं उदाहरण दिलं. ते बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत होते. (Rahul Gandhi statement)
राहूल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदारांपेक्षा तरुण मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला सायंकाळी वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. परंतु, त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला पाहिजे होते. तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले होते. हा प्रकार अचंबित करणारा आहे. हे अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे तीन मिनिटे लागतात. मग तुम्ही गणना केली तर याचा अर्थ असा होईल की मतदार पहाटे दोन वाजेपर्यंत रांगेत उभे होते. म्हणजेच महाराष्ट्रातील निवडणुकीत रात्रभर मतदान सुरु होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही असंही ते म्हणाले आहेत. (Rahul Gandhi statement)
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील व्हिडिओ चित्रिकरणचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की, व्हिडिओग्राफी होत आहे का? तर त्यांनी केवळ व्हिडिओग्राफीला नकार दिला नाही, तर कायदाही बदलला, म्हणून आता तुम्ही व्हिडिओग्राफीची मागणी करू शकत नसल्याचं सांगितले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झालं आहे. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेकवेळा सांगितलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (Rahul Gandhi statement)
देवेंद्र फडणवीस यांची टीका
काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या लोकशाहीची बदनामी करत आहेत, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले, भारतीय लोकशाहीची, भारतीय संविधानाने तयार केलेल्या संस्थांची राहुल गांधी बदनामी करत आहेत. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे निंदनीय आहे. वारंवार निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. खरा देशभक्त विदेशात जाऊन देशाची बदनामी करणार नाही. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेची विश्वासार्हता मिळवली तरच त्यांची मते वाढतील. आणि निवडणुका जिंकाव्यात. परदेशात भारताची बदनामी करून ते निवडणुका जिंकू शकत नाहीत. उलट त्यांचीच उंची कमी होऊ शकते. (Rahul Gandhi statement)
हेही वाचा :
पोलिस अधिकाऱ्यांने केले मृतदेहाचे वूडकटरने तुकडे
पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप