नवी दिल्ली : दक्षिणेकडील राज्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. विशेषत: इतिहासाच्या पुस्तकांत दक्षिणेकडील राज्यांच्या कामगिरीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. सध्या काही विशिष्ट राजवंशांनाच जास्त महत्त्व दिले जाते. चोल आणि पांड्यांसारख्या राजवटीला खूप कमी लेखले जाते, असा आरोप दाक्षिणात्य अभिनेता आर. माधवन याने केली आहे.(R. Madhavan)
एनसीईआरटी शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माधवनने केलेली टीका महत्त्वाची आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. एनसीईआरटीने इयत्ता ७ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांऐवजी आता पवित्र भूगोल, महाकुंभ उत्सव, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांवरील धड्यांचा समावेश करण्यात आला आहे.(R. Madhavan)
‘न्यूज१८ शोशा’शी गप्पा मारताना माधवनने भारतीय इतिहासाच्या काही भागांवरच इतरांपेक्षा जास्त लक्ष का दिले जाते, असा सवाल उपस्थित केला. “हे मी सांगताना अडचणीत येऊ शकतो, पण तरीही मी ते सांगेन,” असे सांगून तो म्हणाला, “मी शाळेत इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा मुघलांवर आठ प्रकरणे, हडप्पा आणि मोहेंजो-दारो संस्कृतींवर दोन, ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्यलढ्यावर चार आणि दक्षिणेकडील राज्यांवर फक्त एक प्रकरण होते तेही – चोल, पांड्या, पल्लव आणि चेरस अशा राजवटींवर मिळून एकच.”
ही या राजवटीची किंवा साम्राज्याची एक वैभवशाली परंपरा होती. मात्र त्यांचा उल्लेख फारसा केला जात नाही.
विशेषत: चोल साम्राज्याचा इतिहासावर लक्षणीय प्रभाव असूनही, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये चोल साम्राज्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही, याबद्दल माधवनने नाराजी व्यक्त केली. मुघल आणि ब्रिटिशांनी सुमारे आठशे वर्षे राज्य केले, परंतु चोल साम्राज्य २,४०० वर्षे टिकले. याच साम्राज्याने समुद्र प्रवासाचा पाया रचला, व्यापारी मार्ग रोमपर्यंत पोहोचले. त्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव कोरियापर्यंत पसरला होता, तरीही हा समृद्ध इतिहास फक्त एका प्रकरणात संक्षेपित केला आहे, याकडे त्याने लक्ष वेधले.(R. Madhavan)
मुघलांविषयीची प्रकरणे काढून टाकली
माधवन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा एनसीईआरटीने इयत्ता ७ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचे समर्थन आणि टीकाही केली जात आहे.(R. Madhavan)
‘‘हे कोण रचतं? अभ्यासक्रम कोणी ठरवला? तमिळ ही जगातील सर्वांत जुनी भाषा आहे, पण त्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आपल्या संस्कृतीत लपलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची सध्या खिल्ली उडवली जात आहे,’’ असे तो म्हणाला.
हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
पंकजा मुंडेना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत