राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

Praful Patel and Tatkare dropped from the NCP Executive Committee

जमीर काझी : मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार गटाच्या  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रामधील यादीत त्यांचे नाव दुसऱ्यांदा वगळण्यात आल्याने राजकीय  वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले असले तरी  पक्षातर्गत गटबाजीतून हे घडत असल्याची चर्चा व्यक्त होत आहे. (Praful Patel and Tatkare dropped from the NCP Executive Committee)

 पक्षाकडून गेल्या २९ एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात, नवीन कार्यकारिणीत पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि सचिव पदे दिली आहेत. मात्र पटेल व तटकरे यांच्या नावाचा समावेश नाही.या आधीही पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पदावरून हटवल्याच्या चर्चा होत्या, आता पुन्हा दोघांची नावे वगळल्याने पक्षात सुप्त संघर्ष असल्याचे बोलले जात आहे. (Praful Patel and Tatkare dropped from the NCP Executive Committee)

 अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात संघटनात्मक ताबा मिळवण्यासाठी वरिष्ठ नेते (पटेल-तटकरे) आणि पार्थ पवार यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.पार्श्वभूमी:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळली असून, पक्षात संघटनात्मक बदल केले जात आहेत. या नवीन घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अंतर्गत राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Praful Patel and Tatkare dropped from the NCP Executive Committee)

तांत्रिक चूक दुरुस्त केली जाईल – सुनेत्रा पवार… याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, ही “ही तांत्रिक आणि क्लेरिकल (लेखनिक) चूक आहे. माध्यमांमध्ये व्हायरल झालेली यादी चुकीची असून, लवकरच सुधारित यादी दिली जाईल,’ (Praful Patel and Tatkare dropped from the NCP Executive Committee)

Related posts

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ