नीट ची पुनर्परिक्षा २१ जूनला

NEET Re-exam on June 21

नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे रद्द केलेली नीट ची पुनर्परिक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आला आहे. ही पुनर्परिक्षा २१ जूनला देशभर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. १२ मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) नीटची परीक्षा रद्द केली होती. तीन मे देशभर ही परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील २२ लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. (NEET Re-exam on June 21)

सीबीआयकडून नीट पेपर फुटीचा तपास युद्धपातळीवर सुरू असून देशभर अनेक ठिकाणी धाडी टाकून संशयितांना अटक केली आहे. पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात पोहोचले असून नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातून काही संशयितांना अटक केली आहे. नीट चा पेपर फुटल्याची पहिली घटना राजस्थानमध्ये उघड झाली होती. हस्तलिखित नीटच्या पेपरची विक्री करण्यात आली होती. एका पेपरची किंमत अंदाजे १५ लाख रुपये होती अशी माहितीही तपासात उघड झाली. त्यानंतर एनटीएने नीटची परीक्षा रद्द करुन नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. (NEET Re-exam on June 21)

आज एनटीएने एक्स पोस्ट करुन नीटच्या पुनर्परिक्षेची तारीख जाहीर केली. पोस्टमध्ये एनटीएने म्हटले आहे की नीट (युजी) २०२६ ची परीक्षेच्या तारखेची घोषणा… नॅशनल टेस्टंग एजन्सीने (NTA) भारत सरकारच्या मान्येते नीट २०२६ ची पुनर्परिक्षा रविवारी २१ जून रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी केवळ एनटीए च्या अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर काल गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नीटच्या पुनर्परिक्षेवर चर्चा झाली. या बैठकीला उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग, सीबीएसई चे अध्यक्ष राहूल सिंग उपस्थित होते.  (NEET Re-exam on June 21)

Related posts

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा