पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

Bomb-like object equipped with a timer sparks alarm at a Pune hospital

पुणे : पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी बॉम्बसदृश्य वस्तू मोकळ्या जागेत आणून ठेवली. बॉम्बसदृश्य वस्तूला सात तासाचा टायमर लावला होता. पोलिसांनी ही वस्तू निकामी केली असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. ई बाईकवर आलेल्या एका व्यक्तीने बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. (Bomb-like object equipped with a timer sparks alarm at a Pune hospital)

पुण्यातील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बाथरुममध्ये एका महिला कर्मचारेला संशयस्पद वस्तू दिसली. ती चमकत असल्याने तिने हॉस्पिटलमध्ये वरिष्ठांना त्याची माहिती दिली. बाथरुममध्ये डॉ. विलास गायकवाड आणि त्यांचे सहकारी गेले असता चार कांड्या, टायमर आणि वायर जोडलेली एक वस्तू दिसली. ही बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचे लक्षात आल्यावर हॉस्पिटलला धोका होण्याची शक्यता होती. रुग्णांना कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून डॉ. गायकवाड ही बॉम्बसदृश्य वस्तून हॉस्पिटलबाहेरील मोकळ्या जागेत ठेवली. त्यानंतर त्याची कल्पना पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर आलेल्या बॉम्बशोधक पथकाने तात्काळ संशयास्पद वस्तू निकामी केली. (Bomb-like object equipped with a timer sparks alarm at a Pune hospital)

पोलिसांनी घटनेचा ताबडतोब तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यावर एक व्यक्ती हॉस्पिटलच्या परिसरात बॉक्स ठेऊन निघून गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता. बॉक्स घेऊन येणारी व्यक्ती एकटीच होती की आणखी त्याचे साथीदार होते याचा पोलिस तपास करत आहेत. (Bomb-like object equipped with a timer sparks alarm at a Pune hospital)

Related posts

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ