Pak’s appeal to residents: दोन महिन्यांचा रेशनसाठा ठेवा

Pak’s appeal to residents

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारही सावध झाले आहे. शुक्रवारी (२ मे) व्याप्त काश्मीर प्रशासनाने भारताच्या प्रत्यक्ष सीमेजवळील रहिवाशांना किमान दोन महिन्याचा रेशनसाठा करण्याचे आवाहन केले आहे. (Pak’s appeal to residents)

२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथील पर्यटनस्थळावर नागरिकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात २८ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा आरोप भारताने केला आहे.

पाकिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत. अस्वस्थ पाकिस्तानने काही राजनैतिक पावले उचली आहेत.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने शुक्रवारी कराची आणि लाहोरचे काही हवाई क्षेत्रावर बंदी जाहीर केली आहे. यापाठोपाठ नियंत्रण रेषेवरील (एलओसी) १३ मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी रेशन साठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अन्वर उल हक यांनी शुक्रवारी स्थानिक विधानसभेत सांगितले.

ते म्हणाले की, प्रादेशिक सरकारने १३ मतदारसंघांना अन्न, औषधे आणि इतर सर्व मूलभूत गरजा पुरवण्यासाठी एक अब्ज रुपयांचा ($३.५ दशलक्ष) आपत्कालीन निधी देखील तयार केला आहे. (Pak’s appeal to residents)

नियंत्रण रेषेवरील भागातील रस्ते देखभालीसाठी सरकारी आणि खाजगी मालकीची यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.

भारत सरकारने मंगळवार (२२ एप्रिल) पासून उच्चस्तरीय बैठकांचा सपाटला लावला आहे.  

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने या आठवड्याच्या सुरुवातीलाच, भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत असल्याचे त्यांच्याकडे ‘विश्वसनीय पुरावे’ आहेत. आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत, असे म्हटले आहे.

लष्करी हल्ल्याच्या वाढत्या भीतीने, व्याप्त काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी १,००० हून अधिक धार्मिक शाळा १० दिवसांसाठी बंद ठेवल्या. (Pak’s appeal to residents)

दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होणार

भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक लवकरात लवकर घेण्यात येईल, असे परिषदेचे अध्यक्ष राजदूत इवांगेलोस सेकेरिस यांनी सांगितले. त्यांनी दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘‘बैठक घेण्याचे आवाहन करण्यात आले तर मला वाटते की ही बैठक झाली पाहिजे. कारण, कदाचित ही मते व्यक्त करण्याची संधी देखील असेल आणि यामुळे थोडा तणाव कमी होण्यास मदत होऊ शकेल.’’ असे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सेकेरिस हे संयुक्त राष्ट्रांमधील ग्रीसचे स्थायी प्रतिनिधी आणि मे महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
कराची, लाहोरचे हवाई क्षेत्र महिनाभर बंद

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या