Prabhat kumar promoted: प्रभात कुमार, प्रशांत बुरडे बनले डीजी!

Prabhat kumar promoted

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांचे प्रलंबित बढती व बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी प्रभात कुमार आणि प्रशांत बुरडे  यांना महासंचालक (डीजी) पदावर शुक्रवारी पदोन्नती देण्यात आली. अन्य चार अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. (Prabhat kumar promoted)

प्रभात कुमार यांना सध्या कार्यरत असलेल्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या संचालक पदावर तर बुरडे यांना लोहमार्ग विभागाचे प्रमुख पद पदोन्नत करून बढती देण्यात आली.

खात्यामध्ये वरील दोन्ही पदे ही ‘साईड ब्रँच’ समजली जातात. गृह विभागाच्या वतीने पदोन्नती आदेशाबरोबरच एडीजी दर्जाच्या आणि चार अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये  पोलीस मुख्यालयातील नियोजन व समन्वय विभागाचे सुनील रामानंद यांची राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत (सीआयडी) बदली करण्यात आली आहे. तर पोलीस प्रशिक्षण व खास पथकाचे प्रमुख राजकुमार व्हटकर यांना राज्य राखीव दलात ( एसआरपी) हलवण्यात आले. त्यांच्या जागी प्रशासन विभागाचे के. एम. प्रसन्ना यांची बदली केली आहे. रेल्वेचे अप्पर महासंचालक प्रवीण साळुंखे यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. (Prabhat kumar promoted)

क्रिम पोस्टिंगवरील बदल्यांना मुहूर्त कधी?
राज्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या आयुक्त, सह आयुक्त, आयजी, उपायुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दर्जाच्या यंदा मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. त्याला कधी मुहूर्त मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.

हेही वाचा :
 भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी
दहशतवादी कृत्ये यापुढे देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील

Related posts

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

आमदार गायकवाडांची  ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी