मुंबई : प्रतिनिधी : मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस रोडवर मेट्रो उभारणीसाठी सुरू असलेल्या बांधकामावरील पिलरच्या सिमेंटचा भाग रिक्षावर कोसळला. या अपघात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन ते चारजण जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर केली आहे. (One killed as part of metro construction collapses on rickshaw)
अपघातासंबधी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट (एमएमआरडीए) एक्स वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की मेट्रोल लाईन ४ प्रकल्पाजवळ मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील पियर १९६ जवळील पॅरापेटचा एक भाग कोसळला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने संचालक बसवराज एम. भ्रदगोड यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्ती केली आहे. तसेच या दु:खद घटनेबद्दल आम्ही दु:खी असून मृतांचा कुटुंबियाप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच एमएमआरडीएकडून मृतांच्या वारसांना भरपाई दिली जाईल. तसेच जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च एमएमआरडीए करेल. (One killed as part of metro construction collapses on rickshaw)
घटनास्थळावर मुंबईच्या नुतन महापौर रितू तावडेंनी भेट दिली. तसेच कामात निष्काळजीपणा आणि दोषीवर कारवाई होणार असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार अदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. मुलुंड दुर्घटनेतील जबाबदार कंत्राटदाराला सरकार काळ्या यादीत टाकणार का असा सवाल केला आहे. कंत्राटदाराला काही लाखांचा दंड होईल आणि पुन्हा कंत्राट दिले जाईल. भाजपच्या राज्यात मानवी आयुष्याची काही किंमत नाही. मेट्रो मार्गावरुन पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, बाईक खड्ड्यात पडणे अशा घटना घडत आहेत. (One killed as part of metro construction collapses on rickshaw)