NIRBHAYA in MP: सामूहिक बलात्कारानंतर भयंकर कृत्य…

NIRBHAYA in MP

इंदूर : निर्भयाच्या भयानक घटनेची पुनरावृत्ती येथील एका गावात घडली. नराधमांनी एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिला जबर मारहाण केली आणि तिच्या गुप्तागामध्ये रॉडसारखी वस्तू घातली. तिचे आतडे बाहेर आले. त्यात अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. खांडवा येथील एका गावात ही भयंकर घटना घडली. (NIRBHAYA in MP)

याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती डीआयजी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली.

जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किमी आणि इंदूरपासून १७० किमी अंतरावर असलेल्या खलवा भागातील एका गावात रक्तरंजित गुन्हा घडला. (NIRBHAYA in MP)

संबंधित पीडिता दोन मुलांची आई आहे. ती शुक्रवारी रात्री गावात एका लग्नासाठी गेली होती.

‘‘लग्न समारंभानंतर, ती शुक्रवारी रात्री आरोपी हरीसह तिच्या नातेवाईक महिलेला तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जवळच्या शेतात सोडण्यासाठी निघाली. मात्र ती त्या रात्री परतली नाही. ती त्यांच्यासोबतच राहिली असावी, असे तिच्या कुटंबीयांना वाटले. ती महिला हरीच्या घरी गेली. तिथे त्यांनी सहआरोपी सुनीलसह दारू प्यायली,’’ असे एएसपी रघुवंशी म्हणाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हरीच्या आईने दावा केला की शुक्रवारी रात्री ते त्यांच्या घरात झोपले होते. शनिवारी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला कोणीतरी ओरडताना ऐकू आले. कोण आहे हे पाहण्यासाठी बाहेर पडली. मात्र समोरचे भयंकर दृश्य पाहून भीतीने तिचा थरकाप उडाला. पीडिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत वेदनेने व्याकूळ अवस्थेत पडली होती. (NIRBHAYA in MP)

कशीबशी उठून ती अंगणात आली. दुसऱ्याच क्षणी ती अंगणात बेशुद्ध पडली. शेजाऱ्याने महिलेच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले.

एएसपी रघुवंशी यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘कुटुंबीयांनी तिला त्यांच्या घरी नेले पण जास्त रक्तस्त्राव होत असतानाही तिला रुग्णालयात नेले नाही. दुपारी १:३०च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी फोन करून पोलिसांना कळवले. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला.’’

प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्यावर धारदार किंवा कठीण वस्तूने क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता आणि तिच्या अंतर्गत जखमाही गंभीर होत्या, असे आढळून आले आहे. (NIRBHAYA in MP)

रघुवंशी म्हणाले, ‘‘विच्छेदन अहवालानुसार पीडितेच्या गुप्तांगाला गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधारे, कामगार म्हणून काम करणारे त्याच गावातील रहिवासी हरी पालवी (४०) आणि सुनील कोरकू (३०) यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’ विच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘‘पीडितेच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तिच्या आतड्यांमधून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तिचे गर्भाशय आणि मूत्राशय शाबूत होते परंतु गर्भाशय असलेली पिशवी फाटली गेली होती. रॉड किंवा काठीसारख्या कठीण वस्तूचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. शरीरावर ओरखडेही आढळले.’’

हेही वाचा :
हेरगिरीप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक
कैद्यांना हॉटेलमध्ये मिष्टान्न; प्रेयसींची भेट

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

पेपरफुटी आणि एकलव्याचा अंगठा

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?