Heavy damage : अवकाळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान

Heavy damage

सोंडोली : प्रतिनिधी : सलग आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, काळेवाडी, खेडे, शिराळे, शित्तूर वारूण या भागांतील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका आणि भुईमूग यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार महिन्यांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली आहे. (Heavy damage)

शेतामध्ये गुडघाभर साचलेल्या पाण्यातून पिके काढण्याचा आटापिटा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. घरी आणलेला मका पावसाने भिजल्यामुळे त्याला कोंब आले आहेत. काढलेले पीकही सुद्धा कुजून गेले आहे.

या नुकसानीसह येत्या भात पेरणीचा हंगामही धोक्यात आला आहे. पावसाने पंधरा दिवस उघडीप दिली तर शेतजमीन तयार होणार आहे. मान्सून सुरू होण्याच्या उंबरठ्यावर उघडीप न मिळाल्यास शेतकरी पुढील हंगामासाठीही उभा राहू शकणार नाही, अशी स्थिती आहे. (Heavy damage)

शासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा, नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून योग्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

‘‘शेतातील भुईमूग कुजलेला पाहून अश्रू अनावर होतात,’’ अशा भावना सोंडोली गावचे शेतकरी भीमराव रामचंद्र पाटील यांनी बोलून दाखवल्या. शासनाच्या दुर्लक्षावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. आता शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली नाही, तर शेतकऱ्यांचे पुढील पीक घेणेही अशक्य होईल,’’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :
मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
सामूहिक बलात्कारानंतर भयंकर कृत्य…

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर