Jail racket busted : कैद्यांना हॉटेलमध्ये मिष्टान्न; प्रेयसींची भेट

Jail racket busted

जयपूर : कैंद्यांना हॉटेलमध्ये मनसोक्त जेवण, त्याच्यापैकी काही कैद्यांसाठी हॉटेलमध्ये खास व्यवस्था, काहींच्या प्रेयसींच्या भेटी आणि काहींना ‘विश्वासू’ महिलांची भेटी तेही कायद्याच्या रक्षकांनीच घालून दिल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. या प्रकरणी पाच कॉन्स्टेबलसह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. (Jail racket busted)

जयपूरमधील एका हॉटेलच्या लॉबीबाहेर तुरुंगाचे रक्षक चहा घेत होते आणि हे कुख्यात कैदी आरामात नाश्ता करत होते. टेबलाखालील बॅकपॅकमध्ये त्यांच्या हातकड्या लपवून ठेवल्या होत्या. यांपैकी एक जोडपे एका महिलेच्या नावाने बुक केलेल्या खोलीत झोपले होते. त्यात एक दोषी खंडणीखोराची विश्वासू होती, तर दुसरी त्याची साथीदार. कैद्यांना हॉटेलमधील खोलीत भेटायला आलेल्या  महिलांपैकी एकाची पत्नी आणि दुसरी एकाची प्रेयसी होती. पोलिसांच्या आशीर्वादाने हा सगळा प्रकार सुरू होता. या भयंकर प्रकारामुळे राजस्थानच्या तुरूंगातील कारागृह पोलिस आणि कैद्यांच्या टोळ्यातील साटेलोटे उघड झाले आहे. (Jail racket busted)

लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेले पाच कैदी जयपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेत. त्यांना वैद्यकीय तपासणी करण्याच्या बहाण्याने बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी केवळ एक कैदी रुग्णालयात पोहोचू शकला. रफिक बकरी, भंवर लाल, अंकित बन्सल आणि करण गुप्ता हे चार कैदी शहरातील हॉटेल्समध्ये गायब झाले. त्यांना पोलिस एस्कॉर्टने मदत केल्याचा आरोप आहे. शिवाय तुरूंगातील डॉक्टरांनीही ते आजारी असल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी परवानगी दिली होती.

या घटनेत रविवारपर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली. यात पाच कॉन्स्टेबल, चार कैदी आणि त्यांचे चार नातेवाईकांचा समावेश आहे. या प्रकाराने  खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि तुरुंगातील काही अधिकारी आणि पोलिसांच्या सहभागाने सुरू असलेल्या रॅकेटमुळे जयपूरची तुरुंग व्यवस्था किडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Jail racket busted)

‘‘ही व्यवस्था पैशावर चालते. यात डॉक्टर, एस्कॉर्ट कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी हे सर्व यात सहभागी आहेत,’’ असे एका कैद्याने चौकशीदरम्यान कथितपणे कबूल केले.

२५ हजारांत सौदा

तपास अधिकाऱ्यांच्या मते, या कैद्यांनी यासाठी मध्यस्थामार्फत २५,००० रुपये दिले होते. प्रत्येकी ५,००० रुपये मिळणार असल्याने एस्कॉर्ट्सनीही त्यांच्या या कृत्याकडे डोळेझाक केली.

डीसीपी (पूर्व) तेजस्वी गौतम म्हणाले की, रफिकच्या पत्नी आणि भंवरची एक जुनी मैत्रिण अशा चौघांची जलूपुरा येथील हॉटेलमध्ये भेट झाली. रफिकच्या पत्नीकडे ड्रग्ज सापडले. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोप आहेत. अंकित आणि करण यांनी विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. हे हॉटेल अंकितच्या मैत्रिणीने बुक केले होते. (Jail racket busted)

शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता हे चौघे परत येणार होते. मात्र कोणीही वेळेवर परतले नाही. एका कैद्याच्या एका नातेवाईकाला ४५,००० रुपयांसह एका हॉटेलमध्ये पकडण्यात आले. पोलिसांना परिसरातून अनेक कैद्यांची ओळखपत्रे सापडली. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागचा मास्टरमाइंड हा एक दोषी खंडणीखोर आहे. तो तुरुंगातूनच सूत्रे हलवत आहे. तो गणवेशातच आहे. जास्त पैसे देणाऱ्यांसाठी हे नेटवर्क काम करते.

हेही वाचा :
 मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
हेरगिरीप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक
पुतीन पूर्ण वेडे झालेत  

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी