New Pope: नव्या पोप यांच्या निवडीत चार भारतीयांचा सहभाग

New Pope

नवी दिल्ली : पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी (२१ एप्रिल) निधन झाल्यानंतर नवे पोप यांच्या निवडप्रक्रियेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये जगभरातील एकूण १३५ कार्डिनल सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भारताच्या चार कार्डिनल्सचाही समावेश आहे. (New Pope)

पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे नऊ दिवसांचा दुखवटा पाळण्यात येईल. हा दुखवटा ‘नोव्हेनडियाल’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत नवे पोप यांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ‘पेपल काँक्लेव्ह’ची तयारी करण्यात येईल. या परिषदेत भारताचे कार्डिनल फिलीप नेरी फेररो, कार्डिनल बासिलिओस क्लिमिस थोट्टुनकल, कार्डिनल अँथनी पूला आणि कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्हाकाड हे चौघे मतदान करतील. यांपैकी, ५१ वर्षीय कुव्हाकाड हे सध्या सायरो-मलबार कॅथलिक चर्चचे भारतीय कार्डिनल आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे सिर्कोनव्हॅलेझॉनी ॲप्पिया येथील डिकॉन ऑफ एस अँटोनिओ डी पोडोव्हा हे पदही आहे. अन्य धर्मीयांसोबतचा सुसंवाद आणि परस्परआकलन यांचा प्रसार करण्यासाठी व्हॅटिकनतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्येही ते आघाडीवर आहेत. (New Pope)

कार्डिनल फेररो हे भारतातील गोवा आणि दमणचे मेट्रोपॉलिटन आर्चबिशप म्हणून काम पाहतात. कॅथलिक बिशप्स ऑफ इंडिया या परिषदेचेही ते अध्यक्ष आहेत. फेडरेशन ऑफ एशियन बिशप्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. ६३ वर्षीय कार्डिनल पूला हे हैदराबादचे मेट्रोपॉलिटन आर्चबिशप आहेत. कार्डिनल थोट्टुनकल हे त्रिवेंद्रम ऑफ दि सायरो-मलानकाराचे मेजर आर्चबिशप आहेत. सायनॉड ऑफ सायरो-मलानकारा चर्चचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. (New Pope)

सध्या कॉलेज ऑफ कार्डिनलचे एकूण २५२ सदस्य असून त्यांपैकी १३५ सदस्य पुढील कॉन्क्लेव्हमध्ये मतदान करण्यासाठी पात्र आहेत. व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपेल येथे होणाऱ्या बैठकीत नवे पोप यांची निवड केली जाते. शतकानुशतकांच्या परंपरेनुसार जोपर्यंत या चॅपेलमधून काळा धूर बाहेर येतो, तोपर्यंत पोप यांच्या निवडीविषयी सहमती झालेली नसते. एकमताने पोप यांचे नाव निश्चित झाल्यानंतर चॅपेलमधून पांढरा धूर बाहेर पडतो.

हेही वाचा :
पोप फ्रान्सिस यांचे निधन
अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा

Related posts

धोक्याची भाषा, राजकीय सक्ती आणि समाजाचा आत्मविश्वास

समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर  

सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांना यंदाचा कुसुम पुरस्कार