New municipal corporations in Pune : पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका

New municipal corporations in Pune

पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका होणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रत्येकी पाच लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी महानगरपालिका करण्यात  येणार असल्याचे पवारांनी सांगितले.  उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी पहाटे सकाळी पावनेसहा वाजण्याच्या सुमारास  चाकण आणि परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडी संदर्भात पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना  पवारांनी नव्याने होणाऱ्या तीन महानगरपालिकांची नावे सांगत त्याबाबतची घोषणा केली. (New municipal corporations in Pune)

चाकण येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, “तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि सर्व परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या गोष्टी मिळणार नाहीत”. या निधीतून रस्ते, भुयारी गटारी निर्माण करता येतील. त्यासाठी जागतिक बँक आणि केंद्र सरकारचा पैसे आणता येईल. हा निर्णय काहींना आवडणार नाही. पण, काळानुसार निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे पवारांनी स्पष्ट केले. (New municipal corporations in Pune)

अनेक जिल्ह्यांत नव्या महानगरपालिका करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिका नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली. मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार येथे महानगरपालिका झाली. सहा सात ठिकाणी महानगरपालिका झाल्या आहेत. तिथे आता पूर्वीपेक्षा वेगाने विकास झाला आहे. तसे आपल्याला आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसारखेच वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली आणि दोन्ही मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची परिसरात एक महानगरपालिका करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमधून नदी ओलांडून आलो की बाकीच्या भागात एक महानगरपालिका करावी लागेल. एक महानगरपालिका हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे, तिथे करावी लागणार आहे. साधारण पाच लाख लोकसंख्या असल्यावर महानगरपालिका करता येते, असे अजित पवार यांनी म्हटले. (New municipal corporations in Pune)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक