New Mumbai Air Port : नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरमध्ये उड्डाण

New Mumbai Air Port

नवी मुंबई : विशेष प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वांत जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करण्यात यावी. ते या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उड्डाण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (१२ जुलै) व्यक्त केला. (New Mumbai Air Port)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिल्लई, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय  येनपुरे, उपायुक्त रश्मी नांदेडकर आदी उपस्थित होते. (New Mumbai Air Port)

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १० जून २०२२ रोजी सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टरच्या संपूर्ण जागेवर शंभर टक्के प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती एनएमआयएएलला प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि सिडकोने भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी अंदाजे दोन हजार कोटी खर्च केले आहेत. (New Mumbai Air Port)

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २९ मार्च २०२२ रोजी प्रकल्पासाठी वित्तीय ताळेबंदी  साध्य केली.

सिडकोतर्फे विकासपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमान C-295 द्वारे उदघाटटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर SU 30 ने दोन लो पास केले आहेत. तसेच इंडिगो एअरलाईन्सच्या एअरबस A320 ने २९ डिसेंबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. (New Mumbai Air Port)

सध्या सुमारे १३ हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबरपूर्वी हे काम पूर्ण करावे, अशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, हे विमानतळ सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा
आ. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर आव्हाड म्हणाले…

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर