मुंबई : विशेष प्रतिनिधी : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार आहे. लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Pollution control policy)
मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते होते. यावेळी परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायूप्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक वाहनाला प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र लागू केले आहे. तथापि, ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा ते प्रमाणपत्र बोगस असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगाने घसरत चालला आहे. त्याला बऱ्याचअंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते. (Pollution control policy)
भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड आधारित प्रदूषण नियंत्रणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणवत्ता निर्देशकांनुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले.
हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्याच्या आत जाहीर करा
आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवा