Murder of a rickshaw driver : मित्रानेच केली रिक्षा चालकाची गळा चिरुन हत्या

Murder of a rickshaw driver

कोल्हापूर : प्रतिनिधी : वृद्ध रिक्षाचालकाची गळा चिरुन हत्या घडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हत्या करुन घर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस चक्रावले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू करुन संशयिताला अटक केली आहे. . मोहन नारायण पोवार (वय ७३, हनुमान नगर, आयटीआय पिछाडी, पाचगांव रोड) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. चंद्रकांत केदारी शेळके वय ७३, रा. मोहिते मळा देवकरण पाणंद असे संशयिताचे नाव आहे.   शेळके आणि पोवार हे दोघेही मित्र आहेत. मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. (Murder of a rickshaw driver)

गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर, पाचगांव रोडवरील एका घरातून धूर येऊ लागला. आग विझवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. काही जागरुक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. आग विझवल्यानंतर घराची तपासणी केली असता बेडरुम घरमालक मोहन पोवार यांचा धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. खूनाची घटना जुना राजवाडा पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक झाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांची पाहणी केली.  गळा चिरुन खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी बेडरुमला आग लावण्याचा प्रयत्न संशयितानी केला असावा असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून एक खाकी ड्रेस घातलेली एक व्यक्ती त्यांच्या घरात गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. पोवार यांच्या ओळखीची व्यक्ती असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून चंद्रकांत केदारी शेळके याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. चंद्रकांत शेळके हा मोहन पोवार यांचा वर्गमित्र आहे. आज गुरुवारी सकाळी तो फिरत मोहन पोवार यांच्या घरी चालत फिरत आला. दोघे बोलत असताना त्यांच्यात जुन्या गोष्टीवरुन वाद झाला. यावेळी मोहन पोवार यांनी शेळके यांना शिवी दिल्याने त्यांनी त्यांच्या कानावर ठोसा मारला. तसेच तिथेच पडलेल्या चाकून गळ्यावर वार केले. तसेच वायर ओढल्याने खोलीला आग लागल्यानंतर तिथून तो निघून गेला. (Murder of a rickshaw driver)

कालच झाला होता पोवारांचा सत्कार

हनुमान नगर येथील एका मंडळाने मोहन पोवार यांचा सत्कार केला होता. बारा वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. अतिशय काबाडकष्ट करुन त्यांनी मुलाला शिकवले असून मुलगा पुष्कराज पवार याला नुकतीच एका शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लागली आहे. काबाडकष्ट करुन कुटुंब वाढवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता. (Murder of a rickshaw driver)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?