विश्वास पाटील यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Mukundrao Patil Journalism Award to Vishwas Patil

नेवासा : प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे विश्वास पाटील यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यशोधक दीनमित्रकार  मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी पुरस्काराची घोषणा केली.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. मंगळवार स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२५ च्या पुरस्कारांची  घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील यांनी  यांनी पुरस्काराची घोषणा केली. विश्वास पाटील यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. (Mukundrao Patil Journalism Award to Vishwas Patil)

साहित्य पुरस्कार-२०२५, रवींद्र रेखा गुरव,कोल्हापूर(कादंबरी-बे दुणे शून्य), माधव  जाधव,नांदेड (कथा-आमचं मत आम्हालाच),धनाजी धोंडीराम घोरपडे,सांगली (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा),गजानन इंदुशंकर देशमुख,अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो), संजय बोरुडे,अहिल्यानगर(ललित गद्य-लोकधन), प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण).विशेष पुरस्कार: सचिन वसंत पाटील,सांगली (मायबोली रंग कथांचे). वरील ग्रंथनिवड प्रा.डॉ.सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब  सय्यद या निवड समितीने केली आहे. (Mukundrao Patil Journalism Award to Vishwas Patil)

Related posts

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी