Khandoba Subhashnagar teams win : खंडोबा, सुभाषनगर संघांचे विजय, बालगोपाल, झुंजार क्लब पराभूत

Khandoba Subhashnagar teams win

कोल्हापूर : प्रतिनिधी:  येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए शाहू छत्रपती फुटबॉल साखळी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळावर ४-२ असा विजय मिळवत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. तत्पुर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबने झुंजार क्लबचा ३-१ असा पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पूर्वार्धात बालगोपालची आघाडी

खंडोबा तालीम विरुध्द बालगोपाल तालीम हा सामना चुरशीचा होणार अशी अटकळ बांधून दोन्ही संघांच्या समर्थकांनी मैदानात गर्दी केली होती. खंडोबा संघाने सामन्यात झकास सुरुवात केली. दुसऱ्या मिनिटाला. रोहित जाधवच्या पासवर कुणाल दळवीने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालकडून २० व्या मिनीटाला गोलची परतफेड केली. प्रतिक पोवारने गोल करून सामना १-१ असा केला. यानंतर २४ व्या मिनीटाला बालगोपालच्या सुजित आर.च्या पासवर अभिनव साळोखे याने गोल नोंदवून बालगोपाल संघास  २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी मध्यंत्तरापर्यंत टिकली. (Khandoba, Subhashnagar teams win)

उत्तरार्धात खंडोबाकडून तीन गोल

 उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी खंडोबा संघ मैदानात उतरला. ४४ व्या मिनीटाला कुणाल दळवीने वैयक्तीक व संघाचा दुसरा गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. ५८ व्या मिनीटाला रोहित जाधव याने गोल नोंदवून संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ६९ व्या मिनीटाला विष्णू टी.एम. याने गोल नोंदवून संघाला ४-२ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पूर्ण वेळेत दोन गोलची आघाडी कायम टिकवत खंडोबाने सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली. खंडोबाच्या एस. शाहिर व स्टॅलिन यांनी तर बालगोपालच्या ऋतूराज पाटील व देवराज मंडलिक यांनी उत्कृष्ठ खेळ केला. (Khandoba, Subhashnagar teams win)

पूर्वार्धात झुंजारचे दोन गोल

दुपारच्या सत्रातील पहिला सामना झुंजार क्लब विरुध्द सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सुभाषनगरने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. १२ व्या मिनीटाला समर्थ चिलेने पहिला गोल केला. पाठोपाठ १५ व्या मिनीटाला सुधीर कोटीकलाने दुसरा गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

शाम भोईटेचा गोल

उत्तरार्धातही सुभाषनगरचा आक्रमक खेळ केला. . ४९ व्या मिनीटाला सुधीर कोटीकलाने वैयक्तीक दुसरा व संघाकरिता तिसऱ्या गोलची नोंद केली. यामुळे सामन्यात सुभाषनगरला ३-० अशी भक्कम आघाडी मिळाली. झुंजार कडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. यात त्यांना सामन्याच्या अखेरच्या क्षणी यश आले. शाहू भोईटे याने ८१ व्या मिनीटाला एकमेव गोलची परतफेड केली. अखेर सामना सुभाषनगरने ३-१ असा जिंकला. (Khandoba, Subhashnagar teams win)

आजचा सामना :

फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, दुपारी १.३० वाजता.

संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या निवड चाचणीमुळे शिवाजी मंडळ वि. वेताळमाळ सामना पुढे ढकलला

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर