Mother murdered by stepchildren  : दारुसाठी पैसे न दिल्याने सावत्र मुलाने केला आईचा खून

Mother murdered by stepchildren

कोल्हापूर : प्रतिनिधी : दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने सावत्र आईवर खलबत्ताने डोक्यात घालून खून केल्याची दुर्दवी घटना कोल्हापुरात घडली. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Mother murdered by stepchildren)  

दुर्दवी मृत झालेल्या महिलेचे नाव सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असून मुलाचे नाव विजय अरुण निकम (वय ३०) असे नाव आहे. ही घटना राजरामपुरीतील साळुंखे पार्क परिसरात सकाळी साडेसहा वाजता घडली.

पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. विजय आणि त्याची सावत्र आई सावित्रीबाईची यांची मंगळवारी रात्री भांडण झाले होते. त्याने मद्यपान केले होते. सकाळी झोपून उठल्याबरोबर त्याने आईकडे दारुसाठी पैसे मागितले. आईने नकार दिल्यावर घरातील खलबत्त्याने त्याने आईवर हल्ला चढवला. व्यसनाधीन असलेल्या विजयने खलबत्त्याने डोके ठेचून काढल्याने सावित्रीबाईंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरात कळताच खळबळ उडाली. राजरामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विजयला अटक केली. (Mother murdered by stepchildren)  

सावित्रीबाई या काबाडकष्ट करुन उदरनिर्वाह करत होते. महाद्वार रोडवर त्या वस्तू विक्री करुन घर चालवत होत्या. विजयला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली आहे. विजय सेंट्रिंग, फ्लेक्स बोर्ड पेस्टिंगची काम करत होता. पण मिळकतीतील सर्व पैसे दारुवर खर्च करत होता.  सावित्रीबाईंचा खुनाची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mother murdered by stepchildren)  

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप