Modi warns Pakistan : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत

Modi warns Pakistan

नवी दिल्ली : ‘‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला. (Modi warns Pakistan)

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी हे विधान केले.

“जेव्हा ‘राष्ट्र प्रथम’ असा आपला संकल्प असतो, तेव्हा कठोर, पोलादी निर्णय घेतले जातात,” असे ते म्हणाले.(Modi warns Pakistan)

पाकिस्तानवर टीका करताना मोदी म्हणाले, ‘‘भारत कोणत्याही प्रकारचे आण्विक ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. अशा धमक्यांच्या नावाखाली कार्यरत असलेल्या दहशतवादी तळांवर आम्ही निर्णायक कारवाई करू. सरकार पुरस्कृत दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे भयानक वास्तव जगाने पाहिले. तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहिले. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा सर्वांत मजबूत पुरावा आहे.’’

ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल संरक्षण दलांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, ‘‘भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. दहशतवादी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हते की भारत असा धाडसी निर्णय घेऊ शकेल. परंतु जेव्हा एखादा राष्ट्र एकजूट होऊन ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होतो, तेव्हा पोलादासारखे निर्णय घेतले जातात आणि शक्तिशाली परिणाम मिळतात.’’(Modi warns Pakistan)

“दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूर आता नवीन सामान्य गोष्ट आहे,” असे मोदी म्हणाले. सशस्त्र दलांचे कौतुक करताना त्यांनी प्रारंभीच, “मला आपल्या सशस्त्र दलांना सलाम करायचा आहे,’’ असे म्हटले. ‘मी आपल्या सैनिकांचे शौर्य प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो. अपर सिंदूर ही न्यायाची प्रतिज्ञा आहे,’ असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ लोकभावनेचे प्रतिबिंब

“गेल्या काही दिवसांत आपण देशाचा संयम पाहिला आहे. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही, तर ते लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. जेव्हा आमच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट केली, तेव्हा त्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांच्या आत्म्याचाही नाश झाला,” असे मोदी म्हणाले.

“मी प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला ‘ऑपरेशन सिंदूर’ समर्पित करतो, ” असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा उल्लेख केला.(Modi warns Pakistan)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले की जेव्हा आमच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली तेव्हा त्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचा आत्माही उद्ध्वस्त झाला. आपल्या महिलांच्या कपाळावरून ‘सिंदूर’ पुसून टाकण्याचे परिणाम आता शत्रूला कळले आहेत; ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नव्हते, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा :
युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे
भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग