आमदाराशी तुच्छ वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा ; आमदार मिटकरीची  मागणी 

MLA Mitkari demands action against the police

जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमाना अपघाता प्रकरणी डीजीसीए व व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल न करून घेता आमदाराशी हुज्जत घालणाऱ्या पोलीस उपायुक्त रविंद्र मुंढे आणि मरीन लाईन्स पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर हे प्रकरण शेकण्याची शक्यता आहे .याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी याबाबत कारवाई करण्यासाठी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मशन’ च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतीकडे केली आहे. तसेच ‘एक्स’वर पोस्ट करीत अद्याप बाबासाहेबांचा भीमाचा कायदा…’ कायम आहे, असा इशारा पोलिसांना दिला आहे.

डीसीपी मुंढेचा एफआरआय दाखल करुन घेण्यास नकार

अजित पवार दुर्घटनाप्रकरणात नागरी उड्डाण संचलनालय आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बुधवारी मु्ंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार संदीप क्षीरसागर व अन्य कार्यकर्ते गेले होते. स्थानिक पोलीस सुरवातीला त्यांचा जबाब नोंदवून घेत असतानाच तेथे पोहचलेल्या मात्र डीसीपी मुंढे यांनी अचानकपणे एफआरआय दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून आमदार व पोलीस अधिकारी यांच्यात जोरात वादावादी झाली. सुमारे दोन तास त्यांच्यात वाद झाल्यानंतर एफआरआय न होताच रोहित पवार यांना माघारी यावे लागले होते. (MLA Mitkari demands action against the police)

लोकप्रतिनिधींना अवमानकार वागणूक

या प्रकारबद्दल मिटकरी यांनी विधानपरिषदेचा सदस्य म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधना संबंधी चौकशीमध्ये हलगर्जी करण्यात येत असल्याबाबत डीजीसीए विरुद्ध एफआयआर नोंद करण्यासाठी आम्ही चार आमदार गेलो असताना कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व डीसीपी यांनी आमदारांना अवमानकारक वागणूक दिली व एफआयआर घेण्यास स्पष्ट नकार दिला. लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देण्याबाबतच्या शासन निर्णयाची पायमल्ली केली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करीत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. (MLA Mitkari demands action against the police)

याबाबत रोहित पवार यांनी माहिती देताना सांगितले होते की, काल डीजीसीएने व्हीएसआर कंपनीवर कारवाई केल्याचे पत्रक काढले. त्यानुसार व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी फक्त पाच विमानांवर कारवाई करण्यात आली आहे. एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नवीन बीएनएसएस कायद्यानुसार हा दखलपात्र गुन्हा ठरतो. या महाराष्ट्रातील मोठा नेता विमान अपघातात गेला आहे. (MLA Mitkari demands action against the police)

शशिकांत शिंदे यांचा स्थगन प्रस्ताव

अजित पवार यांच्या अपघाताबाबत संशय वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्याबाबत विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला. हा गंभीर विषय असून जनतेसमोर सत्य यायला हवे अशी मागणी केली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी याप्रकरणी सरकारने सभागृहात निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले.

बारामतीतही एफआरआय नाही

रोहित पवार आज हजारो कार्यकर्त्यासमवेत बारामती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. स्थानिकांनी जवळपास तीन तास पोलीस ठाण्याला वेढा घातला होता. मात्र पोलिसांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे यामागे मोठया नेत्याचा हात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांचबरोबर अपघाताचे सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही थांबणार नसल्याचे स्पष्ट केले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर