Minister Bhujbal : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध : छगन भुजबळ

Minister Bhujbal

जमीर काझी : मुंबई : मराठा समाजाला  आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसीतील मधल्या लहान  जातीचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे त्यांना स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल, शासनाने तसे केल्यास त्या विरोधात पुन्हा ओबीसीची वज्रमुठ उभी करू, लाखोच्या संख्येने आम्ही मुंबईत येऊ,असा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकारी हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा नाही तर तो मागासवर्गीय आयोगाचा आहे. कुणबी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी आमची भूमिका आहे. जे कुणबी असतील त्यांना लाभ द्यावा मात्र सरसकट सर्वांनाच कुणबी म्हणून घ्यायला आमचा विरोध आहे, असेही भुजबळांनी स्पष्ट केले. (Minister Bhujbal)

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सांताक्रुझ येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 बैठकीला ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे,  समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, भटक्या विमुक्तांचे अभ्यासक लक्ष्मण गायकवाड, प्रा. लक्ष्मण हाके, तौलिक समाजाचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, ॲड.मंगेश ससाणे, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.पी टी चव्हाण, कुणबी समाजाचे अध्यक्ष दशरथ पाटील, बापूसाहेब भुजबळ, कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे,  नवनाथ वाघमारे, डॉ. स्नेहा सोनकाटे, वंजारी समाजाचे नेते ,प्रा. सत्संग मुंढे, धनराज गुट्टे, बाळासाहेब कर्डक,लोणारी समाजाचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे, राष्ट्रीय विणकर समाज अध्यक्ष सुनील मेटे, मुकुंद सोनटक्के, मंजिरी धाडगे, दिलीप खैरे, सदानंद मंडलिक, प्रितेश गवळी, शंकरराव लिंगे, आरिफ काझी यांच्यासह ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमधील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (Minister Bhujbal)

यावेळी ना. भुजबळ म्हणाले,’  उच्च न्यायालयात जस्टिस मारलापार्ले यांनी मराठा कुणबी एक नाहीत असा निकाल दिला आहे.  ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले.  तिथे देखील कोर्टाने म्हटले की मराठा समाज सामाजिक मागास नाही.  त्यामुळे मराठा- कुणबी असो किंवा कुणबी- मराठा यांना ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही. काही वर्षांपूर्वी आरक्षणासाठी महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडेच आंदोलने झाली.  महाराष्ट्रात मराठा समाज, पाटीदार, जाट, गुर्जर, या सर्वच समाजांनी आंदोलने केले. यावेळी केंद्र सरकारने ईडब्लूएस हा पर्याय समोर आणला आणि हे आरक्षण लागू केले. या आरक्षणाला घेऊन सुप्रीम कोर्टात जेंव्हा केस गेली त्यावेळी केंद्र सरकारने सांगितले की यामध्ये येणारे समाज हे सामाजिक मागास नाहीत,  मात्र आर्थिक मागास आहेत.  त्यामुळे ते टिकले.असे सांगून ते म्हणाले की,’ ईडब्लूएस आरक्षण महाराष्ट्रात मराठा समाजाला असताना देखील महाराष्ट्रात काही नेते ऐकत नाही आंदोलने होत आहेत. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एसईबीसी  हा पर्याय काढला आणि स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले गेले. मात्र तरी देखील आता ओबीसी मध्येच येण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. अनेक गॅझेटचा उल्लेख केला जातो. पण या सर्व गॅझेट जर तपासले तर या सर्व गॅझेट मध्ये कुणबी आणि मराठा यांची स्वतंत्र आकडेवारी लिहिली आहे. (Minister Bhujbal)

१९२१ सालच्या गॅझेट मध्ये मराठा – १४ लाख ७ हजार,  कुणबी ३४ हजार असा उल्लेख आहे त्यानंतरच्या १९३१ सालच्या गॅझेट मध्ये देखील मराठा आणि कुणबी असे स्वतंत्र नोंद आहे. हे सगळे पुरावे आज मी स्वतः मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांना भेटून दाखवले. 

मंत्री भुजबळ म्हणाले,  आपण आता तयारीला लागायचे आहे. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून ओबीसींच्या वाट्यामध्ये वाटेकरी नको असे आंदोलने करायची आहेत. काहीही झाले तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी येऊ देणार नाही ही आपली भूमिका असली पाहिजे.आपल्यावर अन्याय झाला तर आपण देखील मुंबईत धडकू असा इशारा त्यांनी दिला. 

ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकारी हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा नाही तर तो मागासवर्गीय आयोगाचा आहे. पुढे ते म्हणाले की, कुणबी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी आमची भूमिका आहे. जे कुणबी असतील त्यांना लाभ द्यावा मात्र सरसकट सर्वांनाच कुणबी म्हणून घ्यायला आमचा विरोध आहे. (Minister Bhujbal)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या