Goa traffic jam : बेळगाव-गोवा मार्गांवरील वाहतूक सात तास ठप्प

Goa traffic jam

बेळगाव : प्रतिनिधी : चोर्ला घाटमार्गे बेळगावाहून गोव्याला जाणाऱ्या मार्गांवर पहाटे ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. गोव्याला चोर्लामार्गे जाणाऱ्या प्रवाशांची आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहचालकांची पंचाईत झाली. अखेर सात तासांनी वाहतूक सुरळीत झाली. (Goa traffic jam)

बेळगाव – चोर्ला-गोवा मार्गावर कालमनी आणि आमटे गावच्या दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यातच दुसरा ट्रक बाजूने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना रस्ता खचला. तो ट्रकही उलटला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे सकाळपासून शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी व व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.(Goa traffic jam)

बेळगावहून गोव्याला दूध, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पाठवला जातो. वाहतूक ठप्प झाल्याने वाहने रस्त्यातच थांबून होती.

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक