Love triangle murder : प्रेमाच्या त्रिकोणातून खून

Love triangle murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रेमाच्या त्रिकोणातून मित्राने मित्राला पाण्याच्या खणीत ढकलून खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास अटक केली आहे. महेंद्र प्रशांत कुंभार वय १८ रा. केर्ले, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. (Love triangle murder)

शाळेतील मैत्रीणीवर आपले एकतर्फी प्रेम होते, मात्र त्या मैत्रिणीचे महेंद्र कुंभार याच्यावर प्रेम होते. या रागातूनच चिडून आपण महेंद्रचा खून केल्याची कबूली संशयित मुलाने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्याची माहिती दिली.  केलें (ता. करवीर) येथील हनुमाननगर येथील खणीमध्ये महेंद्र कुंभार नावाच्या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी मिळून आला.  हा घातपात आहे की अपघात आहे या दृष्टीने करवीर पोलिसांनी तपास सुरु केला होता. महेंद्र कुंभार याला मंगळवारी सायंकाळी मित्राचा फोन आला म्हणून घरातून घाईगडबडीने गेला होता. यानंतरच तो बेपत्ता झाल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी महेंद्रच्या फोनचे डिटेल्स तपासून एका अल्पवयीन संशयीताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.  मात्र पोलिसांनी संशयीताच्या मोबाईलचेही डिटेल्स तपासल्यानंतर महेंद्रला शेवटचा फोन करणारा मित्र संशयीत असल्याचे समोर आले. (Love triangle murder)

पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी करतान संशयीताच्या मोबाईची कुंडलीच त्याच्या समोर ठेवली. तसेच घटना घडलेल्या खणीजवळ असणाऱ्या एका सिसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मोपेड खणीकडे आल्याचे दिसून आले. यातील एक मोपेड महेंद्रची तर दुसरी संशयीत आरोपीची असल्याचे समोर आले. हे सर्व दाखविल्यानंतर संशयीताने खूनाची कबुली दिली. (Love triangle murder)

दोघेही शाळेपासून मित्र

मयत महेंद्र आणि संशयित शाळेमध्ये एकत्र होते. शाळेत असताना संशयीताचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र ती मुलगी महेंद्रवर प्रेम करत होती. याचाच राग आपल्या मनात होता. यातूनच आपण महेंद्रला संपवण्याचे नियोजन केले. मंगळवारी रात्री साडेसात वाजता संशयीताने महेंद्रला केलें फाट्यावर बोलावून घेतले. तुझ्याशी बोलायचे आहे, असा बहाणा करुन त्याला मोहिते खणीजवळ नेले. या ठिकाणी महेंद्र सोबत बोलत असताना संशयित अल्पवयीन मुलाने त्याला पाठीमागून लाथ मारून खणीत ढकलून दिल्याचे सांगितले. (Love triangle murder)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर