Masud Azar : दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील १० ठार

Masud Azar

नवी दिल्ली :  प्रतिनिधी : पाकिस्तानने पोसलेला जैश- ए- मोहम्मदचा दहशतदवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा जण ‘ऑपरेशन सिंदूर’मधील एअर स्ट्राईकमध्ये ठार झाले. भारतीय वायुदलाच्या विमानानी नऊ ठिकाणी अचूक लक्ष्य गाठत दहशतवादी अड्ड्यांचा सुपडासाफ केला. (Masud Azar)

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना हवाई दलाने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले. जैश- ए- मोहम्मदचा तळावर केलेल्या हल्ल्यात दहशतवादी अझर महमूदच्या कुटुंबातील दहा तर निकटवर्तीय चार सदस्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये अजहरा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा याचा देखील समावेश असल्याची महिती पुढे आली आहे. मसूद अझहरची मोठी बहिण आणि तिचा पती, पुतण्या आणि त्याची पत्नी यांचाही समावेश आहे. (Masud Azar)

‘बीबीसी उर्दु’ने दिलेल्या वृत्तामध्ये पीओकेमधील बहावलपूरमधील सुभान अल्लाह मशिदीवर भारताने केलेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि जवळचे चार सहकारी मारले गेल्याचे जैश- ए-मोहम्मदने एका निवेदनाद्वारे सांगितले आहे असे वृत्तात म्हटले आहे. हे निवेदन सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात अझहरचा एक जवळचा सहकारी आणि त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी ठार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या अत्याचाराने सर्व नियम मोडले, आता कोणीही दयेची आशा करु नये अशी धमकीही दिली आहे. (Masud Azar)

बहावलपूर हे पाकिस्तानातील मोठे शहर आहे. ते लाहोरपासून ४०० किलोमीटर अंतरावर आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओनुसार सुभान अल्लाह कॅम्पचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. तसेच मशिदही उद्धवस्त झाली आहे. या ठिकाणी जैश- ए- मोहम्मदकडून दहशतवादी भरती, निधी संकलन आणि दहशतवादी प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जात होते. (Masud Azar)

मसूद अझहरने यापूर्वी भारताविरुद्ध अनेकवेळा मोठे कट रचले आहेत. तो जैश- ए- मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. उरी आणि पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही तोच सुत्रधार होता. (Masud Azar)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर