मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, चार अधिकाऱ्यांचे निलंबन

Manhole fall claims a life

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाई न झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना आज गुरुवारी साकीनाका येथे मॅनहोलमध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनावर टीका केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.  (Manhole fall claims a life)

साकीनाका येथे मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख ही व्यक्ती वाहून गेली. चार तासांनी या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो मोबाईलवर बोलत रस्त्यांवरुन जात असताना उघड्या मॅनहोल पडल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यावेळी मॅनहोलवर जाळी बसवण्याचे काम सुरू होते. कामावरील कामगारांनी त्यांना सूचना केली असताना मोबाईलवर बोलत असल्याने त्यांना कळायच्या आत ते मॅनहोलमध्ये पडले.

सत्ताधारी, विरोधकांची टीका

 या घटनेनंतर शहरात मुंबई महानगरपालिकेवर टीका झाली. विधानसभा पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आयुक्त भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहाय्यक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगले, सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांना निलंबित करण्यात आले. (Manhole fall claims a life)

मॅनहोलवर जाळी बसवत असताना दुर्घटना

आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पावसाळीपूर्वी कामाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, मुंबईत एक लाख ३ हार ९२६ मॅनहोल आहेत. त्यापैकी ९६ हजार ३८३ मॅनहोलवर जाळी बसवली आहे. मधल्या काळात रस्त्यांच्या कामामुळे १८०० पेक्षा जास्त मॅनहोल रस्त्याखाली गाडले गेले आहेत. ४४४६ मॅनहोल रस्त्यांच्या कामांमळे खोलावे लागले. रस्त्यांची कामे जसजशी पूर्ण होईल तशी जाळी बसवण्यात आली. एल वॉर्डमधील ७५ मॅनहोलवर जाळ्या लावण्याचे काम शिल्लक होते. चार मॅनहोलवर जाळ्या बसवणे शिल्लक होते त्यातील एका मॅनहोलवर जाळी बसवताना ही दुर्घटना घडली. (Manhole fall claims a life)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग