राज्यात महायुती आघाडीवर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज (दि.२३) सकाळी ११ पर्यंत आकडेवारीनुसार भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे. तर, महायुती २१५ जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीचा निकाल पाहून प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे. तर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच इतके मोठे यश मिळवले आहे.

ही आहेत भाजपच्या विजयीची कारणे :

लाडकी बहीण योजना

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहिण योजना राबवली होती. या योजनेतून राज्य सरकारच्या वतीने लाभार्थी महिलांना महिन्याला १,५०० रूपये देण्यात येत आहेत. यासह महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यास २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा महायुतीला झाला आहे.

सज्जाद नोमाणींचं विधान

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमाणी यांनी एक विधान करुन राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावरुन भाजपने वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता.

‘बटेंगे तो कटेंगे’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात बदल करत ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला होता. यामुळे राज्यातील हिंदू मते आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले आहे.

जरांगेंचा तो निर्णय

राज्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात फुट निर्माण झाली होती. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी अनेक मागण्या केल्या होत्या. परंतु, महायुती सरकारने त्या मान्य केल्या नाहीत. यामुळे ओबीसी मतदार महायुतीच्या बाजूने होते. याचा निवडणूकीत महायुतीला फायदा झाला.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा