महाराष्ट्र गुजरातमधून चालवू देणार नाही : जयंत पाटील

मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी थेट इशाराच महायुती सरकारला दिला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  लगावला आहे.  (Jayant Patil)

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ, फोटो विरोधकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. सभेला मिळालेल्या अल्प प्रतिसादावर

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली. मुंबईतील मोदींच्या सभेतील उपस्थितीवरून हे स्पष्ट  झाले की, आमचे येथील लोकंही आमची आणि इथे आवाजही आमचाच… जय महाराष्ट्र !!!,असे पाटील यांनी नमूद केले  आहे (Jayant Patil)

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ