मुंबई : प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका वेगवेगळ्या होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. (Local Body election in four steps)
सर्वोच्च न्यायालयाने रखलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सक्रीय झाली आहे. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला दिले असून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. एक सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना अंतिम होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकेत चौरंगी प्रभाग रचना करण्याची घोषणा केली आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूकीची घोषणा करणार आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. (Local Body election in four steps)
निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार टप्प्यात घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात प्रभाग अंतिम रचना होईल तर दसऱ्यानंतर आणि दिवाळीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूका वेगवेगळ्या होणार आहेत. एकीकडे एकाचवेळी देशातील सर्व निवडणूका घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यात चार टप्प्यात निवडणूका करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाच टप्प्यात निवडणूका घेणार का याचीही चाचपणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीत तर विधानसभा निवडणूकीत महायुतीने विजय मिळवला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुती पूर्णपणे जोर लावणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वापासून प्रयत्न सुरू आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेची सत्ता मुंबईवर कायम ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती एकत्र लढण्याची घोषणा केली असली तरी अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. (Local Body election in four steps)