पुणे : प्रतिनिधी : पुणे रेल्वे स्थानकाचे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. पुण्यामध्ये रेल्वे विभागाच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. (Bajirao Peshve)
पुणे येथे पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली. या बैठकीला या विभागातील खासदार उपस्थित होते. या बैठकीत खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली. पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. अनेक संघटनांनी अशी मागणी यापूर्वी केली असून या मागणीचा मी पुनरुच्चार करत आहे असे त्या म्हणाल्या. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरुन नागरिकांना आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे, असेही खासदार कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. (Bajirao Peshve)
पुणे रेल्वे स्थानक पाहिल्यावर असा कोणताही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आणि नावाजलेले आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.
खासदार कुलकर्णी यांच्या मागणीमुळे नावा वाद होण्याची शक्यता आहे. माजी महापौर अंकुश काकडे यांनी महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, मागणी केली आहे. तर मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे. (Bajirao Peshve)