Live Streaming of HC: मुंबई उच्च न्यायालयात थेट प्रक्षेपण सुविधा सुरू

Live Streaming of HC

मुंबई :  भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते शनिवारी (५ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे ‘‘लाइव्ह स्ट्रीमिंग’’ लाँच करण्यात आले. त्यामुळे आता उच्च न्यायालयातील खटल्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. (Live Streaming of HC)

तथापि, पहिल्या टप्प्यात उच्च न्यायालयाच्या पहिल्या पाच खंडपीठांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यांमध्ये मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले, न्यायाधीश महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये आणि न्याधीश अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाचा समावेश आहे. (Live Streaming of HC)

लाईव्ह स्ट्रीमिंग सुविधेव्यतिरिक्त, सरन्यायाधीश गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात अलीकडेच स्थापित केलेल्या मोफत वायफाय आणि इंटरनेट सुविधांचेही लोकार्पण केले. ही सेवा वकील, याचिकाकर्ते, न्यायालयीन कर्मचारी आणि माध्यमांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Live Streaming of HC)
विशेष उल्लेखनीय म्हणजे, सध्या फक्त गुजरात उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय, छत्तीसगड उच्च न्यायालय हे युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले जातात. तसेच, कर्नाटक उच्च न्यायालय, गौहत्ती उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय, तेलंगणा उच्च न्यायालय आणि ओरिसा उच्च न्यायालयातील काही न्यायालये लाईव्ह स्ट्रीम केली जातात. तसेच, गुजरातमधील काही प्रमुख जिल्हा न्यायालये देखील युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केली जातात.

हेही वाचा :
नीरव मोदीच्या भावाला अटक
उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळी झाडून हत्या

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर