काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

Legislative Council Election: Uncontested

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे करण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी मागे घेत दानवे यांना ‘ मविआ’ चे उमेदवार म्हणून अर्ज भरला. काँग्रेसने उमेदवार न दिल्याने किंवा इतर कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. (Legislative Council Election: Uncontested)

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी काँग्रेसच्या भवनात जाऊन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ व अन्य नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आगामी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला संधी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी पाठिंबा दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी काँग्रेसन उमेदवार न दिल्याने किंवा इतर कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. (Legislative Council Election: Uncontested)

 दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी, एबी फॉर्म देखील दिल्लीतून पाठवला होता. मात्र, अखेर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा केली. विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली.त्यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाले. (Legislative Council Election: Uncontested)

विधानपरिषदेसाठी १० जागा बिनविरोध .

महाराष्ट्र विधान परिषदेच्या होत १० जागांच्या निवडणुकीसाठी एकूण १० उमेदवार अर्ज दाखल आले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक सहा , शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर राष्ट्रवादी अजित पवार गट व मविआचे एक उमेदवार रिंगणात आहेत. पर्यायाने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून याची औपचारिक घोषणा सोमवारी होईल. (Legislative Council Election: Uncontested)

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे