Komanpa election ward reservation : प्रभाग आरक्षणानंतर उमेदवारी घोषीत करण्याचा सपाटा

Komanpa election ward reservation

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल पाच वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच चौरंगी मतदार संघानुसार निवडणूक होणार असल्याने प्रत्येक प्रभागात ५० टक्के महिलांचे वर्चस्व पहायला मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर स्वत: किंवा घरातील महिलांची उमेदवारीची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाआघाडीचे गणित अजून जमले नसतानाही इच्छुकांनी मात्र आम्ही रिंगणात आहोत हे स्पष्ट केले आहे. प्रभाग क्रमांक आठ, प्रभाग क्रमांक११,  १३ आणि १४ आणि १८ क्रमांकात सर्वसाधारण गटांसाठी प्रत्येकी दोन जागा आल्याने हे प्रभाग लकी ठरले आहेत. (Komanpa election ward reservation)

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात महानगरपालिका प्रशासक प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चलावाड यांनी सहाय्य केले. सर्वप्रथम लोकसंख्येनुसार अनुसुचित जातीसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर इतर मार्गास वर्गाचे प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून अनुसुचित जाती प्रवर्ग महिलांसाठी प्रभागाची सोडत काढण्यात आली. ११ पैकी सहा प्रभाग महिलांसाठी अनुसुचित गटासाठी निश्चित करण्यात आले. त्यानंतर ओबीसीगटातून ११ चिठ्ठ्या काढून महिला इतर मागासवर्ग गटांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा दोन गटाची प्रभाग निश्चित करण्यात आले. (Komanpa election ward reservation)

प्रभाग क्रमांक आणि प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक 1

1 अ :   अनुसूचित जाती

1 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

1 क :  सर्वसाधारण महिला

1 ड :  सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 2

2 अ :   अनुसूचित जाती

 2 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

 2 क : सर्वसाधारण महिला

 2 ड :  सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 3

3 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग 

3 ब :  सर्वसाधारण महिला

3 क : सर्वसाधारण महिला

3 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 4

4 अ : अनुसूचित जाती महिला

4 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग

4 क : सर्वसाधारण महिला

4 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 5

5 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग

5 ब :    सर्वसाधारण महिला

5 क :   सर्वसाधारण महिला

5 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 6

6 अ :  अनुसूचित जाती

6 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

6 क : सर्वसाधारण महिला

6 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 7

7 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग

7 ब :   सर्वसाधारण महिला

7 क : सर्वसाधारण महिला

7 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 8

8 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग

8 ब : सर्वसाधारण महिला

8 क : सर्वसाधारण

8 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 9

9 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग

9 ब :  सर्वसाधारण महिला

9 क :  सर्वसाधारण महिला

 9 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10

10 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग

 10 ब :  सर्वसाधारण महिला

 10 क : सर्वसाधारण महिला

 10 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 11

11 अ : अनुसूचित जाती महिला

 11 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग  महिला

11 क :   सर्वसाधारण

11 ड :  सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 12

12 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग

12 ब : सर्वसाधारण महिला

12 क : सर्वसाधारण महिला

12 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 13

13 अ :  अनुसूचित जाती महिला

13 ब :   नागरिकांचा मागास प्रवर्ग  महिला

13 क :  सर्वसाधारण

13 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 14

14 अ :  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

14 ब :   सर्वसाधारण महिला

14 क : सर्वसाधारण

14 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 15

15 अ :  अनुसूचित जाती

 15 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

 15 क :  सर्वसाधारण महिला

 15 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 16

16 अ :  नागरिकांचा मागास प्रवर्ग   

 16 ब :   सर्वसाधारण महिला 

16 क :   सर्वसाधारण महिला

16 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 17

17 अ :   अनुसूचित जाती महिला

 17 ब :    नागरिकांचा मागास प्रवर्ग

 17 क :  सर्वसाधारण महिला

 17 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 18

18 अ : अनुसूचित जाती महिला

18 ब :   नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

18 क : सर्वसाधारण

18 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 19

19 अ :  अनुसूचित जाती

19 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

19 क : सर्वसाधारण महिला

19 ड : सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक 20

20 अ : अनुसूचित जाती महिला

20 ब :  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

20 क : नागरिकांचा मागास प्रवर्ग

20  ड :   सर्वसाधारण महिला

20 इ : सर्वसाधारण

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर