Kolhapur Gazetteer : हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी 

Kolhapur Gazetteer

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी , अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केली. (Kolhapur Gazetteer)

कोल्हापूर जिल्ह्याचे १८८१ मध्ये गॅझेटियर प्रसिद्ध झाले. या गॅझेटियरनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ८ लाख १८९ इतकी होती.  त्यापैकी कुणबी लोकसंख्या  २ लाख ९९ हजार ३५० इतकी तर मराठा लोकसंख्या नोंद ६२ हजार २८७ इतकी होती. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये कुणबी लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.  शेती करणारे पण  लढवय्ये कुणबी  आहेत. तसेच शिपाईपणाचा बाणा बाळगणारे शूर मराठे असा असे वर्णन आहे.  मराठी भाषा बोलणारे मराठा आणि कुणबी याच्यामध्ये फारसा भेद दिसत नाही. कुणबी आणि मराठा यांचा परस्पर अन्न व लग्न व्यवहार चालतो  दोघांचे राहणीमान,स्वभाव, देवक, आहार,शेतीसह जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या रूढी परंपरा यात इतके साम्य आहे की मराठा कुणबी या दोघांमध्ये रोटी बेटी व्यवहार (विवाह )होतात. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते मराठा कुणबी एकच आहेत.हे गॅंझेटियर वरुन सिध्द होते. (Kolhapur Gazetteer)

कोल्हापूर जिल्ह्याची २०११ साली लोकसंख्या ३८ लाख इतकी होती,ती सध्या अंदाजे ४२ ते ४३लाख झाली असावी यामध्ये कोल्हापूर जिल्हा मराठा कुणबी बहुल भाग असल्याने मराठा, कुणबी लोकसंख्या २०ते २१लाख  इतकी निश्चित आहे परंतु २०११पासून आतापर्यंत फक्त ६७५० कुणबी दाखल्याची जातपडताळणी होवून जातप्रमाणपत्र दिली गेली आहेत.सन १८८२ साली २ लाख ९९ हजार ३५० कुणबी संख्या होती ती २०२५ साली १५ लाखावर कुणबी लोकसंख्या झाली असावी. परंतु त्या प्रमाणात कुणबी दाखले मिळणे अपेक्षित असताना २०२१ पासून फक्त ६७५० कुणबी दाखले प्रमाणपत्रे मिळाली आहेत.  ती अल्प प्रमाणात मिळाली आहेत.कुणबी दाखले लाखांचा संख्येत मिळणे अपेक्षित असताना दाखले अत्यंत अल्प प्रमाणात मिळाली आहेत. सव्वाशे वर्षापूर्वी गॅझेटियरमध्ये नोंद असणारे  कुणबी गेले कोठे ? असा सवाल करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती संदिप शिंदे  समितीच्या कुणबी शोध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाखाच्या आसपास इतक्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत परंतु १९३२ सालानंतर सर्वसाधारण कुणब्यांनी मराठा नोंद केल्याने कुणबी दाखले मिळणे जिकिरीचे झाले आहे.  त्यामुळे हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सकल मराठे समाजाने केली आहे. (Kolhapur Gazetteer)

सकल मराठा समाजाने राज्य सरकारकडे मागण्या केल्या आहेत.  १८८१झाली तीन लाख कुणबी असताना आतापर्यंत   पंधरा लाख इतकी कुणबी संख्या झाली पाहिजे होती परंतु कुणबी दाखल्याची  अल्प संख्या पाहता लाखो कुणबी नोंदी कोठे गायब झाल्या आहेत त्याचा शोध घ्यावा.

१८८१सालच्या गॅजेटमध्ये मराठा कुणबी एकच आहे असे स्पष्ट असताना १९९६ च्या गॅंझेटमध्ये मराठा कुणबी वेगवेगळे दाखविण्याचे षडयंत्र कोणी केले.१८८१ घ्या मूळ गॅंझेटिअर मध्ये १९९६साली फेरफार करुन मराठ्यांना आरक्षण पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान कोणी केले ? तसेच १९९४ साली शंभर पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये घालत असताना कुणबी जातीलाच बाहेर कां ठेवले यांचे उत्तर समाजाला मिळाले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबीना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, शाहीर दिलीप सावंत, राजू सावंत, राहुल इंगवले, उमेश पोवार, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, संयोगीता देसाई, मनोज नरके, अवधूत पाटील यांच्या सह प्रमुख उपस्थित होते.

मराठा, कुणब्यासह अन्य जाती जमातीच्या लोकसंख्येचा उल्लेख

१८८१ च्या कोल्हापूरचे गॅझेटियर ब्रिटीशांनी प्रसिद्ध केले आहे. या गॅझेटियरमध्ये स्क्षुम नोंद केल्या आहेत. प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये आणि लोकसंख्येची नोंद केली आहे. कोल्हापूर, कागल, चंदगड, आजरा, राधानगरी, भुदरगड, हातकणंगलेचा काही भाग, सध्या कर्नाटकातील रायबाग, कटकोळ, अकोळ या भागांचा समावेश होता. मराठ्यासह कुणबीसह क्षत्रिय, खत्री, मुस्लीम, माळी, बेलदार, बुरुड, गवंडी, महार, मातंग, हणबर, कासार, लोहार, कुंभार, ओतारी, पाथरवट, रंगारी, शिंपी, सोनार, ताबंट, तेली, गुरव, माळी, घडशी, दरवेशी, परिट, धनगर, बेरड, भंडारी यासह अनेक जाती जमातीचा उल्लेख आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर