मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला सातत्याने अडचणीत आणत आहेत. त्यातच ते कथितरित्या रमी खेळतानाचा व्हिडीओ दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावर राजकीय क्षेत्रांतून टीकेची झोड उठली होती. शेतकऱ्यांसंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्याने ते तसेच सरकारही अडचणीत आले होते. त्यांची पाठराखण करता करता मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी नेत्यांच्या नाकी नऊ आले होते. मंगळवारी (२२ जुलै) कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. (Kokate’s controversial statements)
कोकाटे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही.”
त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची पुन्हागोची झाली आहे. (Kokate’s controversial statements)
कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु, त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते चुकीचे आहे. कुठल्याही मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पिकविम्याबाबत अत्यंत चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे, अशी बाजू मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.
राज्यापुढे आव्हाने, पण स्थिती चांगली : मुख्यमंत्री
अन्य राज्यांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था चांगली असल्याचा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याकडे खूप पैसा आहे असे म्हणणार नाही. मात्र, देशातील जी विकसनशील राज्ये आहेत त्यांच्या तुलनेत आपली स्थिती नक्कीच चांगली आहे. आपल्यापुढे आव्हाने आहेत, मात्र, आपल्या राज्याची वित्तीय तूट आम्ही सातत्याने तीन टक्क्यांहून कमी ठेवली आहे. मात्र देशातील अनेक राज्यांची वित्तीय तूट चार किंवा पाच टक्क्यांच्या आसपास आहे.” (Kokate’s controversial statements) पिकविम्याबाबत सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. कृषी क्षेत्रात दर वर्षी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांत आपले सरकार राज्याच्या कृषी क्षेत्रात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल.”
हेही वाचा :
कृषी मंत्र्यांची ‘जंगली रमी’ आणि आव्हाडांची पोस्ट
६४ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी चंदा कोचर दोषी