बेळगाव : प्रतिनिधी : पुणे बंगलोर महामार्गांवर ऑइल टँकरच्या धडकेत तीन कामगार जागीच ठार झाले. अन्य पाच कामगार जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. पुणे बंगलोर महामार्गांवर बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर गावाजवळील इटगी क्रॉस येथे ही घटना घडली. (Kitttur accident)
पुणे बंगलोर महामार्गांवर कित्तूर येथे रस्त्याचे काम सुरु आहे. अनेक कामगार येथे काम करत आहेत. काम सुरु असताना भरधाव वेगाने आलेल्या ऑइल टँकरने रस्त्याचे काम करत असलेल्या कामगारांना उडवले. यावेळी तीन कामगार जागीच ठार झाले. कामगारांना धडक देऊन टँकर महामार्गाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर जावून उलटला. एका कामगाराची स्थिती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघात झाल्यावर टँकर चालक आणि क्लिनर टँकरमध्ये अडकून पडले होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले आहे. (Kitttur accident)