भारतीय महिलांनी मिश्र रिले मध्ये पटकावले रौप्य,

Indian women won silver in the mixed relay

नवी दिल्ली : जपान मधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघांने ४x४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली. शेवटच्या फेरीत भारताच्या विथ्या रामराजने वेग वाढवत व्हिएतनामला मागे टाकल्याने भारताने रौप्य पदक पटकावले. मनू, विथ्या रामराज, पूर्वम्मा आणि विशाल टी.के. असा भारताचा संघ होता. भारताच्या सीमा कुमाराने १० हजार मीटरच्या शर्यतीत ब्राँझ पदक पटकावले.  (Indian women won silver in the mixed relay)

भारतासाठी विशाल टी.के. ने सुरुवात केली. पण सुरवातीला त्याला आघाडी घेता आली नाही. त्यानंतर दुसरा बॅटन घेतलेल्या पूवम्माने सुत्रे हातात घेत थोडी आघाडी वाढली. शेवटच्या टप्प्यात भारत या शर्यंतीतून बाहेर पडणार असे वाटत असताना विथ्या रामराजने ५० मीटरमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि तिने बॅटन मनूकडे सोपवले. मनूने अंतिम टप्प्यात विथ्या रामराजकडे सुत्रे सोपवण्यापूर्वी भारताला शर्यतीत टिकवून ठेवले. आपल्या दमदार अँकर लेग्जसाठी ओळखल्या जाण्याऱ्या विथ्याने शेवटच्या लॅपमध्ये वेग वाढवला आणि भारताला रौप्य पदक मिळवून दिले. बहरीनने या प्रकरात सुवर्णपद पटक पटकावले तर व्हिएतनामला ब्राँझ पदकांवर समाधान मानावे लागले. (Indian women won silver in the mixed relay)

सीमा कुमारीला ब्राँझ पदक

१०० मीटरच्या शर्यतीत भारताच्या सीमा कुमारीने ब्राँझ पदक पटकावले. या प्रकरात १६ वर्षाची पदकाची प्रतिक्षा तिने संपवली. या शर्यतील शेवटपर्यंत सीमा टिकून होती. विन्फ्रेंड यावीने सुवर्ण पदक पटकावले तर जपानच्या नोझोमी तनाकाने रौप्य पदक पटकावले. बाकीच्या स्पर्धंकांना मागे टाकत सीमाने तिसरे स्थान मिळवत ब्राँझ पदकांवरील दावा सिद्ध केला. (Indian women won silver in the mixed relay)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव