Trump criticize Putin : पुतीन पूर्ण वेडे झालेत  

Trump criticize Putin

वॉशिंग्टन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पूर्णपणे वेडे झाले आहेत, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पुतीन यांनी संपूर्ण युक्रेन जिंकण्याचा प्रयत्न केला तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरतील, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, टूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली आहे. (Trump criticize Putin)

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून रविवारी रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प यांनाही युद्ध थांबवण्यात यश मिळालेले नाही. ट्रम्प यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की रशियाचे व्लादिमीर पुतितन यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. पण त्यांच्यासोबत काहीतरी घडले आहे. ते पूर्णपणे वेडे झाले आहेत. सध्या ते विनाकारण अनेक लोकांना मारत आहेत. मी केवळ सैनिकांबद्दल बोलत नाही.”

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष जसे बोलतात तसेच बोलून त्यांच्या देशाचे काही भले करत नाहीत. त्यांच्या तोंडून निघणारी प्रत्येक गोष्ट देशासाठी समस्या निर्माण करत आहे. मला ते आवडत नाही आणि ते थांबवणे चांगले आहे. (Trump criticize Putin)

पुतीन यांच्यावर टीका करताना ट्रम्प म्हणाले, रशियाकडून युक्रेनमधील शहरांवर विनाकारण क्षेत्रणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत. रशियाला संपूर्ण युक्रेन हवा आहे. युक्रेनचा काही भाग त्यांना नको आहे. परंतु असे जर केले तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल. मी जर अध्यक्ष असतो तर रशिया आणि युक्रेन कधीही सुरू झाले नसते. हे झेलेन्स्की, पुतीन आणि बायडेन यांचे युद्ध आहे. ट्रम्पचे नाही.

रशियाने रविवारी रात्री युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी बॉम्बहल्ला केला. आत्तापर्यंतचा युद्धातील हा सर्वांत मोठा हवाई हल्ला होता. यामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पुतीन यांनी टीका केली आहे. (Trump criticize Putin)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर