ITR filing: आयटीआर १५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार

ITR filing

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर २०२५पर्यंत करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. यापूर्वीची मुदत ३१ जुलै २०२५ होती. (ITR filing)

“अधिसूचित आयटीआरमध्ये करण्यात आलेल्या व्यापक बदलांमुळे आणि कर निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तिकर परतावा (आयटीआर) उपयुक्तता प्रणाली तयारी आणि अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, करदात्यांना सुलभ आणि सोयीस्कर फाइलिंग करता येणार आहे. आधीच्या निर्णयानुसार, ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत होती.  मात्र ती १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ’’ असे सीबीडीटीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नवीन अंतिम मुदत दर्शविणारी औपचारिक अधिसूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल, असे आयकर आयुक्त (मीडिया आणि तांत्रिक धोरण) आणि सीबीडीटीचे अधिकृत प्रवक्ते व्ही. रजिथा यांनी सांगितले. (ITR filing) ‘‘या मुदतवाढीमुळे भागधारकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन होईल. तसेच आयकर भरण्यासंबंधीच्या प्रक्रियांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे रिटर्न फाइलिंग प्रक्रिया अचूक होईल अशी अपेक्षा आहे,’’ असे सीबीडीटीने म्हटले आहे.

हेही वाचा :
सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली
‘तुम्हाला विद्यार्थिनीचे आयुष्य बरबाद करायचे आहे…’

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर