मुंबई : भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीकात्मक पोस्ट पुन्हा शेअर करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थिनीला अटक करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या कृतीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच तिची तत्काळ सुटका करण्याचे आदेशही दिले. पोलिस आणि संबंधित कॉलेजलाही त्या विद्यार्थिनीचे आयुष्य बरबाद करायचे आहे, अशी संतप्त टिप्पणीही न्यायालयाने केली. (HC criticised the State)
महाराष्ट्र पोलिसांच्या कृतीबद्दल न्यायालयाने तोंडी आश्चर्य व्यक्त केले.
मुलीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिला ‘गुन्हेगार’ म्हणून वागवल्याबद्दल राज्य आणि महाविद्यालयीन अधिकाऱ्यांवर खंडपीठाने तीव्र शब्दांत टीकाही केली.(HC criticised the State)
न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर सकाळच्या सत्रात सुनावणी झाली.
संबंधित १९ वर्षीय तरुणी सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने आजच मुलीची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. जर आज सूर्यास्तापूर्वी तिला सोडण्यात अधिकारी अपयशी ठरले तर ते कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असे खंडपीठाने बजावले.
संध्याकाळी जेव्हा हा विषय घेण्यात आला तेव्हा खंडपीठाने तपासाच्या स्थितीबद्दल विचारणा केली.(HC criticised the State)
सहाय्यक सरकारी वकिलांनी खंडपीठाला माहिती दिली की चौकशी सुरू आहे आणि पोलिस तिचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासत आहेत, तेव्हा न्यायमूर्ती गोडसे यांनी तोंडी टिप्पणी केली, ‘‘हे पूर्णपणे धक्कादायक आहे. पोलिस अधिकारी आणि कॉलेजही तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसते.’’
मुलीला परीक्षेपूर्वी तिच्या कॉलेजमधून काढून टाकण्यात आले हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. (HC criticised the State)
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मुलीच्या मानसिक आणि भावनिक स्थितीची चौकशी केली आणि तिला परीक्षेला बसता यावे यासाठी तुरुंगातून सोडण्याचे निर्देश दिले. तसेच तिला पूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले. ‘‘या मुलीवर कोणताही सार्वजनिक हल्ला होणार नाही, याची काळजी घ्या. शक्य असल्यास तिला पेपर लिहिण्यासाठी स्वतंत्र वर्ग द्या,’’ असे न्यायालयाने कॉलेजला सांगितले.
हेही वाचा :
सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली
एससी, एसटींविरोधात पद्धतशीर भेदभाव : राहुल गांधी