Liverpool  : विजेत्या फुटबॉल संघांच्या रॅलीत कार घुसली, ५० जखमी

Liverpool

लंडन : हजारो फुटबॉल फॅन्स विजयाचा जल्लोष करत असताना एका माथेफेरुने विजेत्या फुटबॉल संघाच्या रॅलीत कार घुसवली. त्यामुळे ५० हून अधिक फुटबॉल शौकिन जखमी झाले असून २७ जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (Liverpool)

अधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णालयात नेण्यात आलेल्या २७ जणांपैकी चार मुले होती. एका मुलाची आणि एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.  मूल आणि कारखाली अडकलेल्या चार जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

सोमवारी शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रीमियर लीगच्या विजेतेपद परेड दरम्यान लिव्हरपूलच्या चाहत्यांच्या गर्दीत कार घुसवणाऱ्या चालकाला अटक केली. या अपघातात  ५० लोक जखमी झाले आणि २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संघाची ओपन-टॉप बस तिथून गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली, हजारो समर्थक रस्त्यावरून आनंद साजरा करत होते. या घटनेचा भयानक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये सोमवारी लिव्हरपूल चाहत्यांच्या गर्दीत कार घुसली तेव्हाचा क्षण कैद झाला आहे. (Liverpool)

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये गर्दीच्या रस्त्यावरून एक कार वेगाने येत चाहत्यांना चिरडताना दिसत आहे. गाडीने अनेक लोकांना धडक दिली, एका क्षणी गर्दीपासून वाचण्यासाठी गाडी थोडीशी वळली असे दिसते. व्हिडिओमध्ये, चाहते ओरडत आहेत आणि गोंधळ सुरू होताच चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत काही जण हवेत फेकले गेले तर काहींना फरफटत नेले. या घटनेनंतर जखमी लोकांच्या मदतीसाठी लोक धावले.

घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी कारला घेरले. पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी काही चाहते ड्रायव्हरकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी ५३ वर्षाच्या ब्रिटीश नागरिकाला घटनास्थळी अटक करण्यात आली. अपघात कशामुळे झाला याचा तपास अधिकारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Liverpool)

ब्रिटीश पंतप्रधानांची प्रतिक्रिया

ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या घटनेला “भयानक” म्हटले आहे. घटनेनंतर झालेल्या प्रत्येक घटनांचे ते अपडेट घेत आहे. त्यांनी आपत्कालीन पथकाने वेगान धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

“लिव्हरपूलमधील दृश्ये भयावह आहेत.  या घटनेतील जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात . या धक्कादायक घटनेला जलद आणि सतत प्रतिसाद दिल्याबद्दल मी पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे आभार मानू इच्छितो,” स्टारमरने सोशल मीडियावर लिहिले. (Liverpool)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर