इराणचा कतारच्या गॅस प्रकल्पावर हल्ला: भारतीयांची चिंता वाढली

Iran Attacks Qatar's Gas Project

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इराणने आजवरचा सर्वात मोठा हल्ला थेट तेल आणि गॅस पायाभूत सुविधावर केला आहे. जगातील एलएनजी म्हणजे द्रवरुप नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या कतराच्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला आहे. भारत ४७ टक्के गॅस कतारकडून आयात करतो. त्याचा फटका भारतीयांना बसणार आहे. या हल्ल्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढू शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे. (Iran Attacks Qatar’s Gas Project)

इस्त्रायलने इराणच्या साउथ पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून कतारच्या रास लाफान इंडस्टियल सिटीमध्ये असलेल्या एका प्रमुख गॅस क्षेत्रावर हल्ला केला. या घटनेनंतर इराणने कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला इशारा दिला आहे. जर इराणच्या उर्जा सुविधांना लक्ष्य केले तर इराणकडून थेट आखातातील उर्जा प्रकल्पावर हल्ले केले जात आहेत. आखाती खाडी हे गॅसचे भांडार आहे. ते इराण आणि कतारमध्ये विभागले आहे. (Iran Attacks Qatar’s Gas Project)

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका संघर्षाचे भारतावर परिणाम होऊ लागले आहेत. इराणने कतारच्या उर्जा प्रकल्पावर हल्ले सुरू केले आहेत. कतार हा जगातील एलएनजी म्हणजे द्रवरुप नैसर्गिक वायू पुरवठा करणारा सर्वात मोठ्या देशापैकी एक आहे. कतारच्या गॅस प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किंमती वाढण्याचा धोका वाढला आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावर आले. कारण भारत आपल्या एकूण गॅस गरजेपैकी अंदाजे ४७ टक्के गॅस कतारकडून आयात करतो. दरवर्षी भारत अंदाजे २७ दशलक्षटन एलएनजी आयात करतो. त्यापैकी १२ ते १३ दशलक्ष टन गॅस कतारमधून येतो. (Iran Attacks Qatar’s Gas Project)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर