एसटीच्या डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहन मंत्र्यांचा इशारा 

Intervention in ST's diesel purchase will not be tolerated

मुंबई  : प्रतिनिधी :    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. (Intervention in ST’s diesel purchase will not be tolerated)

ते म्हणाले की,’ सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमिटेड आणि भारत प्रेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून खरेदी केले जाते. घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्याकडून प्रति लिटर २  रुपये ७० पैसे सवलत देते. मात्र, संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलती मध्ये ३०  पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचे वर्षाकाठी १० ते १२ कोटींची बचत होऊ लागली. तथापि, तीन रुपयांची सवलत मिळत असली, तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. (Intervention in ST’s diesel purchase will not be tolerated)

मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी चार रुपये पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल ५ रुपये ५० पैसे सवलत मिळत आहे. इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया हे यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगून त्याच धर्तीवर एसटीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.  या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एक कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणे, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून  निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे  प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत, असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले. तसेच डिझेल खरेदीच्या  निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (Intervention in ST’s diesel purchase will not be tolerated)

सध्या एसटी महामंडळावर सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. वर्षाकाठी डिझेल खरेदीवर सुमारे ३४०० कोटी रुपये खर्च होतात. लवकरच ८ हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च अंदाजे ४७०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ १ रुपयांची घट झाली, तरी वर्षाकाठी सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असे सांगितले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर