बेळगाव : प्रतिनिधी : देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे ! अशी चिठ्ठी एका मंदिराच्या हुंडीत सापडल्याने चर्चेचा विषय झाला आहे. कर्नाटकसह सीमाभागात या चिठ्ठीची चर्चा सुरू आहे. गावातील यात्रा कमिटीतील एकाने या चिठ्ठीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. (Interesting note found in temple’s hundi)
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खणदाळ येथे हुली कांतेश्वर नावाचे मंदिर आहे. या मंदिरातील दक्षिणा हुंडीतील पैसे मोजताना हुंडीत मिळालेल्या एका चिठीने रक्कम मोजणाऱ्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हुंडीतील रक्कम मोजण्यासाठी त्यांनी नुकतीच हुंडी उघडली. यावेळी रक्कम मोजताना शंभर व दहा रूपये मूल्य असलेली नोट एकत्रित गुंडाळलेली होती. ती उघडली तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठीही आढळून आली. या चिठ्ठीमध्ये “देवा माझे कष्ट दूर कर, पुढच्या यात्रेच्या अगोदर माझी सासू मरू दे, असा मजकूर लिहिलेला आहे. हा मजकूर कन्नडमध्ये असून तो वाचल्यानंतर पैसे मोजण्यासाठी बसलेल्या यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुटले. जावयाने किंवा सुनेने देवाकडे अशी प्रार्थना केली असावी अशी चर्चा सुरू आहे. सासू मरूदे म्हणणाऱ्या जावयाला किंवा सुनेला सासूचा सासुरवास सहन करावा लागतोय काय अशीही चर्चाही सुरु आहे. (Interesting note found in temple’s hundi)
कमिटीतील एकाने चिठ्ठीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला असून कमेंटबॉक्समध्ये मजेशीर रिप्लाय आले आहेत. (Interesting note found in temple’s hundi)