India-Pak tense: ‘‘राजकीय नेतृत्वाच्या बंधनामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान विमान गमावले’’

India-Pak tense

नवी दिल्ली : भारतीय राजकीय नेतृत्वाने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर किंवा त्यांच्या हवाई संरक्षणावर हल्ला करू नये अशी ‘मर्यादा’ घातली होती. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने (IAF) ‘काही विमाने’ गमावली, अशी कबुली एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिली. (India-Pak tense)

इंडोनेशियातील भारताचे संरक्षण संलग्नक, कॅप्टन (भारतीय नौदल) शिव कुमार यांनी १० जून रोजी इंडोनेशियातील जकार्ता येथे एका चर्चासत्रात सादरीकरणादरम्यान हे तपशील स्पष्ट केले. सादरीकरणात त्यांनी असेही म्हटले की सुरुवातीला आमचे काही नुकसान झाले. त्यानंतर भारतीय सैन्याने त्यांची रणनीती बदलली. १० मे पर्यंत चकमक सुरू राहिली. मात्र सुरूवातीला ७ मे या एकाच दिवशी भारताला नुकसान सहन करावे लागले. (India-Pak tense)

कॅप्टन कुमार म्हणाले की भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा किंवा हवाई संरक्षणाला लक्ष्य न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ‘‘केवळ राजकीय नेतृत्वाने लष्करी आस्थापनांवर किंवा त्यांच्या हवाई संरक्षणावर हल्ला करू नये असे बंधन घातले होते. त्यामुळेच भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांचे नुकसान सहन करावे लागले.’’

ते म्हणाले, ‘‘या घटनेनंतर आम्ही आमची रणनीती बदलली आणि आम्ही लष्करी कारवाई सुरू केली. आम्ही प्रथम शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केली आणि नंतर आमचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून सर्व हल्ले सहजपणे यशस्वी केले.’’ (India-Pak tense)

कॅप्टन कुमार यांच्या वक्तव्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे विमान का गमावले याचे कारण एखाद्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केल्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑपरेशन दरम्यान सुरुवातीच्या नुकसानीनंतर भारताने स्वीकारलेल्या सुधारित रणनीतींवर भारतीय लष्करी अधिकाऱ्याने प्रकाश टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कॅप्टन कुमार यांनी हे तपशील स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. ‘‘पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्यास आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यास का नकार देत आहेत? संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी का फेटाळण्यात आली आहे?” असे त्यांनी २९ जून रोजी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (India-Pak tense)

दूतावासाचे स्पष्टीकरण

दरम्यान, जकार्ता येथील भारतीय दूतावासाने कॅप्टन कुमार यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण जारी केले. त्यांचे उद्धरण संदर्भ सोडून त्यांचे विधान उद्धृत करण्यात आले आहे. त्यांनी केवळ ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आहे, याचा पुनरुच्चार केला, असे त्यात म्हटले आहे.

“माध्यमांमधील वृत्तांत कॅप्टन कुमार यांच्या सादरीकरणातील वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावण्यात आला,” असे दूतावासाने म्हटले आहे.

“या सादरीकरणातून भारतीय सशस्त्र दल आपल्या शेजारच्या इतर काही देशांपेक्षा वेगळे आहे आणि ते नागरी राजकीय नेतृत्वाखाली काम करते,” असे स्पष्ट करत पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही दूतावासाने केली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर