Income Tax raids on steel entrepreneurs : कोल्हापुरात गोवा आयकरचा स्टील कारखानदारांवर छापा

Income Tax raids on steel entrepreneurs

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोव्यातील स्टील उद्योग समुहाचे मुख्य उद्योजकाच्या कोल्हापूर, गोवा आणि उत्तर प्रदेशातील कारखान्यावर गोवा राज्यातील आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले. कोल्हापूरातील औद्योगिक वसाहतीतील कारखाना, बंगल्यावर छापा टाकले आहेत. या घटनेने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. (Income Tax raids on steel entrepreneurs)

गोवा आयकरचे तीन राज्यात छापे

गोव्यात अनुप बन्सल यांचा स्टीलचा उद्योग मोठा प्रोजेक्ट असून त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात आहे. तसेच गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत त्याचे स्टील उत्पादनाचे एक युनिट आहे. उत्तर प्रदेशातही त्यांनी गुंतवणूक केली आहे. गोवा आयकर विभागाकडून गोवा, कोल्हापूर आणि उत्तर प्रदेशातील कारखान्यावर छापे टाकण्यात आले आहेत. काल गुरुवारपासून ही कारवाई सुरू आहे. कारवाईत कोल्हापूर विभागातील आयकर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Income Tax raids on steel entrepreneurs)

कोल्हापुरातील अलिशान बंगल्याची तपासणी

कोल्हापुरात बन्सल यांचा भव्य अलिशान बंगला आहे. या बंगल्यावरही छापा टाकण्यात आला आहे. काल बुधवारपासून (दि.८) कोल्हापूर आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बंगल्यातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. त्यांना रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि कागदपत्रेही मिळाली आहेत. घर आणि गोकुळ शिरगाव येथील कारखान्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज गुरुवारीही आयकर विभागाकडून तपासणी सुरू होती. (Income Tax raids on steel entrepreneurs)

दसऱ्याला केली अलिशान कारची खरेदी

उद्योगपती बन्सल यांनी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर एक अलिशान कार खरेदी केली आहे. पण आरटीओकडून नवीन क्रमांक मिळाला नसल्याने ती कार बंगल्याच्या पार्किंगमध्ये पार्क केली आहे. या वाहनांचीही आयकर खात्याने नोंद घेतली आहे. या कारची किंमत दीड ते पावनेदोन कोटी रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे. (Income Tax raids on steel entrepreneurs)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर