मुंबईत सव्वा लाख नागरिकांना कुत्री चावली

In Mumbai, over 125,000 citizens were bitten by dogs

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात ४० लाख भटकी कुत्री असून एकट्या मुंबई शहरात एक लाख २८ हजार २५२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली.

मुंबईत जवळपास एक लाख भटकी कुत्री

राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबई आणि नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. मुंबई महानगरपालिकेच्या क्षत्रात ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल जागतिक संस्थेच्यावतीने भटक्या कुत्र्यांचे २०२४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईमध्ये ९० हजार ७५७ म्हणजे जवळजवळ एक लाख भटकी कुत्री आहेत. राज्यात जवळपास ४० लाख भटके कुत्रे असून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ९ हजार ४२७ नागरिकांना कुत्रे चावले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तरात दिले आहे. (In Mumbai, over 125,000 citizens were bitten by dogs)

जनजागृतीसाठी डब्ल्यूव्हीएस मिशन रेबीज या संस्थेसोबत करार

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रजनन नियंत्रण नियमावली, २०२३ अन्वये निर्गमित केलेल्या नियमानुसार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करणे, श्वानांची वाढती संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मूलन करणे, मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळणे या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. तसेच स्वतंत्रपणे हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय जनजागृतीसाठी डब्ल्यूव्हीएस मिशन रेबीज या संस्थेसोबत करार केला असून त्यानुसार २०२४ पासून जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी उत्तरात दिली आहे. (In Mumbai, over 125,000 citizens were bitten by dogs)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक